मुक्तपीठ टीम
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. पहाटे साडे चार वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले होते. त्यानंतर नवाब मलिक यांना सकाळी सातच्या सुमारास ईडी कार्यालयात घेऊन गेले. या चौकशीवर आघाडी सरकारच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. राज्याच्या बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ईडीला सरकार बनवायची घाई झाली असेल तर त्यांनी शिवाजी पार्कात यावे, अशी टीका केली आहे.
यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
- ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या!
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू.
- आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
- ईडीच्या कारवाईमुळे महाविकास आघाडीची एकजूट तुटणार नाही.
- या उलट ती आणखी मजबूत होतेय.