मुक्तपीठ टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले अंडरवर्ल्ड संबंधांचे आरोप निरर्थक आहेत. त्यांनी बॉम्ब फोडणार असल्याचे म्हटलं, पण प्रत्यक्षात ओला झालेला फुसका फटाका फोडला. आता मी मात्र, त्यांच्या परदेशातील व्यवहारांचा पर्दाफाश करणार आहे. बुधवारी त्यांच्या अंडरवर्ल्ड संबंधांबद्दल हाड्रोजन बॉम्ब फोडणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केले आहे.
फडणवीसांना मलिकांचे प्रत्युत्तर
- फडणवीसांचे अंडरवर्ल्ड संबंध उघड करणार!
- अंडरवर्ल्डशी माझा कोणताही संबंध नाही
- माझी मुलगी उद्या फडणवीसांना नोटीस पाठवणार.
- मी हसिना पारकरला ओळखत नाही
- देवेंद्र फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी संबध आहेत.
- बुधवारी १० वाजता याबाबत गौप्यस्फोट करणार आहे.
- त्यांचे परदेशातील व्यवहार उघड करणार आहे.
माहिती देणारे कच्चे खेळाडू, मीच कागदपत्रं दिली असती!
- नवाब मलिकांचे बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबध असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न झाला.
- देवेंद्र फडणवीस तुम्ही १९९९मध्ये या शहरात आलात.
- यापूर्वी गोपीनाथ मुंडे नेते होते. त्यांनी देखील दाऊद इब्राहिमशी संबंधित अनेक आरोप केले होते.
- पण गेल्या ६२ वर्षांच्या जीवनात किंवा लोकप्रतिनिधी झाल्यानंतरच्या २६ वर्षांच्या काळात कोणीही आरोप करु शकलं नाही.
- मात्र, तुम्ही माझ्यावर अंडरवर्ल्डकडून खूपच कमी दरानं जागा खरेदी केल्याचा आरोप केला.
- तुम्हाला माहिती देणारे व्यक्ती कच्चे खेळाडू आहेत.
- तुम्ही मागितली असतीत, तर मीच तुम्हाला कागदपत्रं दिली असती.
फडणवीसांनी मुंबईला होस्टेज बनवले होते!
- देवेंद्र फडणवीसांनी अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केला.
- तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केला आहे.
- मी आज बोलणार नाही.
- उद्या देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डचा काय खेळ महाराष्ट्रात आहे.
- देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना शहरात होस्टेज बनवलं होतं याचा उद्या १० वाजता गौप्यस्फोट करणार आहे.
१९८४मध्ये बांधलेली इमारत
- नवाब मलिकांच्या विजयाचा जल्लोष त्याच जागेत
- आम्ही दीड लाख फुट जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी आरोप केला.
- खोटे भाडेकरु ठेवल्याचा आरोप केला.
- त्या दीड लाख फुट जमिनीची पाहणी करा.
- त्या जागेवर शेख मदिनातुल्ल अमान हौसिंग सोसायटी आहे.
- १९८४ मध्ये ती इमारत बांधण्यात आली.
- ती मुनिरा पटेल यांनी रस्सीवाला यांना विकासाचे अधिकार देऊन १४० लोकांना घरं दिली.
- त्याच्या मागे जमीन आहे त्यावर झोपडी आहे.
- तिथं जमीन आहे, तिथेच सॉलिडस कंपनीकडं जमीन आहे.
- गेल्या ३० वर्षांपासून ती जमीन आमच्याकडे आहे. १९९६ मध्ये भाजप आणि शिवसेना सत्तेत होते.
- ९ नोव्हेंबरला मी निवडणुकीत विजयी झालो होतो.
- त्याच गोवावाली बील्डिंगच्या कार्यालयात जल्लोष करण्यात आला होता.
मालकिणीकडून जमीन घेतली!
- आम्ही भाडेकरु होतो, मुनिरा पटेल यांनी आमच्याशी संपर्क करुन आमच्याकडे असलेल्या जागेचा पूर्ण ताबा घ्या, असं म्हटलं.
- आम्ही मालकिणीकडून जमीन घेतली.
- सलीम पटेल याला मुनिरा पटेल यांनी पॉवर ऑफ अॅटर्नी केलं होतं.
- सरकारी दरानुसार आम्ही स्टॅम्प ड्युटी भरली होती.
- सरकारी कागदपत्रात त्याचा उल्लेख आहे.