मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलात दहावी पास विद्यार्थ्यांसाठी करिअरची संधी आहे. नौदलाने नाविक एमआर पदाच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज १९ जुलैपासून सुरू होतील आणि २३ जुलै २०२१ पर्यंत करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता-
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असावे.
शारीरीक पात्रता-
७ मिनिटांत १.६ किमी धावणे, २० स्क्वाट्स आणि १० पुश – अप करता येणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा-
१ एप्रिल २०२१ ते ३० सप्टेंबर २००४ दरम्यान जन्मलेले उमेदवारच यासाठी अर्ज करू शकतात
पगार-
- निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल.
- या दरम्यान त्यांना प्रतिमहिना १४,६०० रुपये स्टायपेंड दिलं जाईल.
- ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना डिफेन्स पे मॅट्रिक्स लेव्हल -3 अंतर्गत २१,७०० रुपये ते ६९,१०० रुपये महिन्याचं वेतन दिले जाईल.
उमेदवारांना डिए व्यतिरिक्त दरमहा ५२०० रुपये एमएसपी देखील देण्यात येईल.
निवड प्रक्रिया-
लेखी परीक्षा आणि फिजिकल फिटनेस टेस्टच्या आधारे निवड केली जाईल.
अधिक माहितीसाठी
भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वरून माहिती मिळवू शकता.