Monday, May 26, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान

November 30, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
National Sculpture Award

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्काराने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्यावतीने वर्ष २०१७, २०१८, आणि २०१९ साठीचे ‘शिल्प गुरू पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव रचना शहा, हस्तकला विकास आयुक्त व्यासपीठावर उपस्थित होते. उपराष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शिल्प गुरू’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय शिल्प पुरस्कार केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

‘शिल्प गुरू’ पुरस्काराचे स्वरूप सुवर्ण पदक ताम्रपत्र आणि दोन लाख रूपये रोख असे आहे. तर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हस्त शिल्पकारांना ताम्रपत्र आणि १ लाख रूपये रोख असे पुरस्कारास्वरूप प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकार सन्मानित

कोल्हापूरचे अमर सातपुते यांना चामडयापासून कोल्हापुरी चपला हाताने बनविण्याच्या कारागिरीसाठी आज राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. सातपुते यांना वर्ष २०१९ साठीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सातपुतेंचा चामडयापासून चपला बनविण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे.

अमर सातपुते हे या व्यवसायात वर्ष २००५ पासून स्वच्छेने काम करीत आहेत. वडिलांकडून चपला तयार करण्याचे बारकावे शिकल्याचे अमर यांनी मनोगतात सांगितले. हस्तकला विभागाकडून महाराष्ट्राबाहेर अनेक‍ ठिकाणी प्रदर्शनानिमित्त स्टॉल लावण्याची संधी मिळते. यातून आणखी काही कल्पना सुचत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यवतमाळच्या रजनी शिर्के यांना भरतकाम हस्तकलेसाठी वर्ष २०१९ च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिर्के यांनी ३२ वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातून भरतकामाचे विशेष प्रशिक्षण घेतले. सध्या त्या यवतमाळ आणि परिसरात बचत गटांतील मुलींना- महिलांना भरतकाम शिकवित असल्याचे त्यांनी सांगितले.

अभय पंडित यांना कुंभार कामासाठी वर्ष २०१८ च्या राष्ट्रीय हस्त शिल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


Tags: Craftsmangood newsMaharashtramuktpeethNational Sculpture AwardUnion Textiles Minister Piyush Goyalकेंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयलघडलं-बिघडलंचांगली बातमीमहाराष्ट्रमुक्तपीठराष्ट्रीय शिल्प पुरस्कारहस्त शिल्पकार
Previous Post

आता शिवप्रताप दिनाच्या ‘तारीख – तिथीचा’ वाद का? संभाजी ब्रिगेडचा संतप्त प्रश्न!

Next Post

‘गामा फाऊंडेशन फिल्म्स’ आणि ‘छाया प्रॉडक्शन’च्या लघुपटांचे स्पेशल स्क्रिनिंग

Next Post
Gamma Foundation Films

'गामा फाऊंडेशन फिल्म्स' आणि 'छाया प्रॉडक्शन'च्या लघुपटांचे स्पेशल स्क्रिनिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra
featured

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

by Tulsidas Bhoite
May 24, 2025
0

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

April 8, 2025
जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!