मुक्तपीठ टीम
अॅरोबॅटिक्स, अॅरोमॉडेलिंग अशा हवाई खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने राष्ट्रीय हवाई क्रीडा धोरण म्हणजेच NASP २०२२चा मसुदा तयार केला आहे. जनतेच्या सूचना जाणून घेण्यासाठी हे मसुदा धोरण प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यावर आलेल्या सूचना आणि प्रतिसादाची सरकारकडून तपासणी केली जात आहे. एनएएसपी २०२२ च्या मसुद्यानुसार, भारताला हवाई खेळांचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजनांवर काम सुरु आहे.
हवाई खेळांना प्रोत्साहनासाठी काय करणार?
- धोरणात अॅरोबॅटिक्स, अॅरोमॉडेलिंग, अमॅच्युअर -बिल्ट अँड एक्सपरिमेंटल एअरक्राफ्ट , बलूनिंग, ड्रोन ग्लायडिंग, हँग ग्लायडिंग आणि पॅराग्लायडिंग मायक्रो-लाइटिंग आणि पॅरा-मोटरिंग स्कायडायव्हिंग आणि विंटेज विमाने यासारख्या बहुतांश हवाई खेळांचा समावेश असेल.
- हवाई क्रीडाप्रकारातील तज्ञांना सहभागी करून सरकार एक साधी, हितधारक -स्नेही आणि प्रभावी शासन व्यवस्था विकसित करू शकते.
- आत्मनिर्भर भारत अभियानाच्या धर्तीवर , हवाई क्रीडा उपकरणांची देशी संरचना , विकास आणि निर्मितीला चालना दिली जाईल.
- जागतिक हवाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीयांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार.
- शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना त्यांच्या अभ्यासक्रमात हवाई खेळांचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार.
देशात हवाई खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी २०२१-२२ या वर्षासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय हवाई क्रीडा धोरण २०२२ ला अंतिम स्वरूप दिल्यानंतर आणि प्रस्तावित भारतीय हवाई क्रीडा महासंघाची (ASFI) स्थापना झाल्यानंतर, सरकार गरजेनुसार निधी जारी करू शकते.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री (जनरल (डॉ) व्ही.के. सिंग (सेवानिवृत्त) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.