मुक्तपीठ टीम
भारतीय वंशाच्या भव्या लाल यांची अमेरिकी अंतराळ संस्था नासामध्ये अॅक्टिंग चीफ ऑफ स्टाफ म्हणजेच कार्यकारी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती जो बायडेन यांना अंतराळ संस्थेत काही बदल आणि पुनरावलोकन करायचे आहे. म्हणूनच त्यांनी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी भव्या लाल यांना दिली आहे. भव्या या भारतीय वंशाच्या अंतराळ वैज्ञानिक आहेत.
नासाने करून दिलेला तिचा परिचय बोलका आहे, “भव्या सर्व बाबतीत या पदासाठी पात्र आहे. तिला अभियांत्रिकी व अवकाश तंत्रज्ञानाचा अनुभव आहे. २००५ ते २०२० पर्यंत त्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण संस्थेच्या संरक्षण विश्लेषण शाखेत सदस्य आणि संशोधक राहिल्या आहेत.”
भव्या लाल यांनी स्पेस टेक्नॉलॉजी, स्पेस स्ट्रॅटेजी आणि पॉलिसी या अनुभवा व्यतिरिक्त त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये पॉलिसी आणि नॅशनल स्पेस कौन्सिलमध्येही काम केले आहे. संरक्षण विभागच नाही तर स्पेस इंटेलिजेंस कम्युनिटीचेही सखोल ज्ञान आहे.
भव्या यांनी दोनदा नॅशनल ओसियानिक अॅडमिनिस्ट्रेशन समितीचे नेतृत्व केले आहे. यापूर्वी नासामध्ये त्या सल्लागार समितीच्या सदस्यही राहिल्या आहेत. अंतराळ संशोधनाच्या बाबतीत त्यांनी अमेरिकन बड्या कंपनी सी-एसटीपीएस एलएलसीमध्येही काम केले आहे. नंतर त्या अध्यक्षही झाल्या. त्यानंतर त्यांना व्हाइट हाऊसमधील स्पेस इंटेलिजेंस समितीचे सदस्य बनविण्यात आले.
अमेरिकन न्यूक्लियर सोसायटी आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजीच्या दोन सरकारी कंपन्यांमध्ये भव्याचे नाव सल्लागार म्हणून होते. त्यांच्या धोरणानुसार अॅस्ट्रोनॉट ट्रेनिंग प्रोग्राममध्ये फेरबदल करण्यात आला. भव्याने मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेतले. यानंतर पब्लिक पॉलिसी अॅण्ड पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये डॉक्टरेट मिळवली.