Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“उद्योजकांचे राष्ट्र म्हणून भारताला घडवण्यासाठी तंत्रज्ञान केंद्रांची उभारणी सहाय्यकारक ठरेल”: नारायण राणे

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंची खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुंबईतल्या कार्यालयाला भेट

September 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
narayan rane

मुक्तपीठ टीम

केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुंबईतल्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी हरियाणातल्या रोहतक इथल्या तंत्रज्ञान केंद्राचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत असलेल्या या केंद्राचा 20 एकरवर विकास करण्यात आला आहे. या केंद्रात दर वर्षी 8,400पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण दिले जाईल अशी माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली. 135 कोटी लोकसंख्येच्या आपल्या राष्ट्राला अधिकाधिक तंत्रज्ञान केंद्रांची आवश्यकता असून त्यांची जलद गतीने उभारणी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

उद्योजकांचे राष्ट्र म्हणून आकार देण्यासाठी आणि राष्ट्रीय जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनात वृद्धी होण्यासाठी या केंद्रांमध्ये विकसित करण्यात आलेले नवे तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे असे ते म्हणाले. या एमएसएमई केंद्रात विकसित तंत्रज्ञान, कोरोना महामारीच्या आव्हानात्मक काळात, आत्मनिर्भर भारत अभियानाला वेग देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दारिद्रयाविरोधातल्या लढ्यासाठी याची मदत होऊन महाशक्ती म्हणून पुढे येण्यासाठी देशाला मदत होईल असे त्यांनी सांगितले.

 

याआधी त्यांनी महाराष्ट्रातल्या, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम संस्थाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

 

राणे यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अधिकाऱ्यांशीही संवाद साधला आणि संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. खासदार डॉ अरविंद शर्मा, एमएसएमई सचिव बी बी स्वैन, एमएसएमई अतिरिक्त सचिव देवेंद्र कुमार सिंग, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीता वर्मा यावेळी उपस्थित होत्या.


Tags: khadi indiaMSMENarayan raneएमएसएमईखादी आणि ग्रामोद्योग आयोगनारायण राणेप्रीता वर्मामुंबई
Previous Post

“पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये आणण्यास विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड”

Next Post

पाणी पुरवठा सुधारण्यासाठी खारघर, द्रोणागिरी आणि उलवे येथे आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Next Post
CIDCO

पाणी पुरवठा सुधारण्यासाठी खारघर, द्रोणागिरी आणि उलवे येथे आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!