मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्यात आता नवा वाद रंगला आहे. आमदार नितेश राणेंच्या म्याव म्याव मांजरासारख्या आवाजावर आक्षेप घेत त्यांच्याविरोधात निलंबणाची मागणी झाली होती. त्याला भास्कर जाधव यांनी जोरदार समर्थन दिले होते. त्याचे उट्टे राणे यांनी त्यांची कोकणातील नाचे अशी संभावना करत दिले. त्यांना प्रत्युत्तर देताना आमदार भास्कर जाधव यांनी राणे यांच्या लोकसभेतील सोशल मीडियावर थट्टा झालेल्या उत्तराची आठवण करून दिली!
वादाचे मूळ काय?
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाहून आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर म्याव म्याव असा मांजरासारखा आवाज काढला होता.
- शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभेत नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी केली होती.
- त्यांना समर्थन देताना भास्कर जाधव यांनी सभागृहात अनेक मुद्दे मांडले होते.
- त्यांच्या आक्रमकतेचेच उट्टे आज नारायण राणे यांनी काढल्याचे मानले जाते.
नारायण राणेंनी कोकणातील नाच्यांची आठवण काढली!
- भास्कर जाधव यांनी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज काढत अंगविक्षेप केले होते.
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी जोरदार आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी ते मागे घेत माफी मागितली होती.
- त्याचा संदर्भ देत नारायण राणे यांनी
- नक्कलीला नक्कलीतून उत्तर दिले जाईल, असे सुनावले.
- कोकणात काही भागात नाचे आहेत, ते होळीच्या दिवशी पैसे दिले की नाचतात.
- त्यातला तो प्रकार त्या दिवशी विधानसभेत झाला.
भास्कर जाधवांनी आठवण करून दिलं राणेंचं लोकसभेतील उत्तर!
- राणेंनी जरा चांगली नक्कल करावी म्हणत, भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर पलटवार केला आहे. तुम्ही संसदेत दिलेले उत्तर संपूर्ण देशाने पाहिले आहे.
- आता नाच्याचे काम तर चांगले करा आणि नाव कमवा.
- विरोधकांना धर्मही समजवून सांगितला आहे.
- भारतीय जनता पार्टीचे लोक इतरांना सौजन्याने वागण्याचे सल्ले देतात, मात्र त्यांच्या पार्टीचे लोक तालिका अध्यक्षांवर काहीही बोलतात, तेव्हा कुठे गेला होता तुमचा राधासुता धर्म? नारायण राणे हे नितेश राणे चुकीचे वागत असतानाही मुलाच्या पाठिशी उभे राहत पाठराखण करत आहेत.