Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नारायण राणे म्हणतात आघाडीकडे बहुमत नाही! आकड्यांमधून समजून घ्या राणेंचा दावा फेक की फॅक्ट…

June 12, 2022
in featured, फेक की फॅक्ट, सरळस्पष्ट
0
balasaheb thorat narayan rane uddhav ajit pawar

तुळशीदास भोईटे /  सरळस्पष्ट

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. त्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बहुमतासाठी लागणारे १४५ आमदारांचे पाठबळ उरलेले नसल्याने ठाकरेंना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असेही राणे म्हणाल्याचं माध्यमांमधील बातम्यांवरून कळत आहे. मुक्तपीठनं राज्यसभा निवडणुकीतील मतांच्या आकड्यांची पडताळणी करून नारायण राणेंचा दावा फेक की फॅक्ट ते तपासलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाकडून राज्यसभा विजयाचा जल्लोष करण्यात आला. त्यासाठी आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती होती. त्यावेळी नारायण राणेंनी महाविकास आघाडी त्यातही शिवसेना आणि ठाकरेंवर कडवट टीका केली.

नारायण राणेंचा महाविकास आघाडी सरकार अल्पमतात गेल्याचा दावा

  • नारायण राणे यांनी महाविकास आघाडीने बहुमत गमावल्याचा दावा केला.
  • शिवसेनेची स्वत:ची मते त्यांच्या उमेदवाराला मिळालेली नाहीत., संजय राऊत फक्त एका मताने पराभूत होण्यापासून वाचले. महाविकास आघाडीचे आठ ते नऊ आमदार फुटले आहेत. याचाच अर्थ सरकार अल्पमतात आले आहे.
  • बहुमतासाठी १४५ आमदारांचं पाठबळ लागतं, तेही तुमच्याकडे नाही.
  • तुम्ही महाराष्ट्राला १० वर्ष मागे नेलं आहे.
  • उद्धव ठाकरे यांना आता सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.
  • त्यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.

काय आहे वास्तव?

  • केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आघाडी सरकार अल्पमतात आल्याचा आरोप केला असला तरी तसं दिसत नाही.
  • महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या २८८ आहे, त्यातील एक सदस्य आमदार रमेश लटकेंचं निधन झाल्याने सध्या २८७ सदस्य आहेत.
  • त्यामुळे बहुमताचा आकडा हा १४४ आहे.
  • राज्यसभा निवडणुकीतील पहिल्या पसंतीची मते पाहिली तर काँग्रेस ४४ + राष्ट्रवादी काँग्रेस ४३ + शिवसेना ४१ + ३३ म्हणजे १६१ आमदारांनी आघाडीच्या चार उमेदवारांना पहिल्या पसंतीची मते दिली आहेत.
  • भाजपाला ४८ + ४८ + २७ म्हणजेच १२३ आमदारांनी पहिल्या पसंतीची मते दिली आहेत.
  • भाजपाने सहावी जागा जिंकताना दुसऱ्या पसंतीच्या मतांचे बळ वापरले आहे, पण ते त्यांच्या कोट्यातून आणि वळवलेल्या अपक्ष, बविआ आमदारांच्या बळावर आहे.

आघाडी आणि भाजपा कोणाकडे किती आमदार?

  • महाविकास आघाडीसोबत १६१ आमदार आहेत.
  • याचा अर्थ महाविकास आघाडीकडे बहुमतासाठी आवश्यक १४४पेक्षा १७ आमदारांचं बळ जास्त आहे.
  • सहावी जागा जिंकल्यानंतरही भाजपाकडे १२३ आमदारांचंच बळ आहे.
  • याचा अर्थ राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी आजही भाजपाकडे २१ आमदार कमी आहेत.

फेक की फॅक्ट?

  • केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या या दाव्याबद्दल राजकीय वर्तुळात केवळ टोकाच्या शिवसेनाद्वेषातून त्यांनी तसं विधान केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण भाजपाने सहावी जागा जिंकली असली, तरी महाविकास आघाडीला मिळालेली मतेही बहुमतासाठी आवश्यक मतांपेक्षा जास्त आहेत.
  • त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा हा फेक असल्याचे दिसत आहे.

Tags: BJPcm uddhav thackerayFake Or FactMva govtNarayan raneSaralSpasthaTulsidas V. Bhoiteतुळशीदास भोईटेनारायण राणेफेक की फॅक्टभाजपामहाविकास आघाडी सरकारमुख्यमंत्री उद्धव ठाकरेसरळस्पष्ट
Previous Post

भाजपा खासदार का देणार शिवसेनेलाच साथ? समजून घ्या कारणं…

Next Post

सरकार का, कधी आणि कसे बंद करते इंटरनेट?

Next Post
internet

सरकार का, कधी आणि कसे बंद करते इंटरनेट?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!