मुक्तपीठ टीम
देश आणि राज्याप्रमाणेच सातारा जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे उपलब्ध वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत आहेत. त्याचा फटका गरजू कोरोना बाधितांना बसत आहे. त्यावर मात करुन लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी फलटणमध्ये एक वेगळा प्रशंसनीय प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रयत्न आहे, फलटणचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी उभारलेल्या १०० बेडच्या कोरोना सेंटरचा.
उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये १०० बेडचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यासाटी त्यांनी सरकारकडून काही मदत मिळेल याची वाट पाहिलेली नाही. त्यांनी सर्व काही केले ते स्वबळावर. आपल्या सभोतालच्या सामान्यांवर जीवाचे संकट उभे ठाकलेले असताना फक्त मिरवत राजकारण करणे त्यांना पटले नाही. त्यांनी स्वखर्चातून कोरोना सेंटर उभारले. त्यामुळे फलटण मधील वाढत्या कोरोना रुग्णांना एक दिलासा मिळाला आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन करून हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.
फलटणच्या कोरोना सेंटरचे वैशिष्ट्य
• उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी स्वखर्चातून हे कोरोना सेंटर उभारले आहे.
• हे १०० बेडचे कोरोना केअर सेंटर आहे.
• या सेंटर मध्ये २४ ऑक्सिजन बेड, ७६ सर्वसाधारण बेड आहेत.
• या सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि संपूर्ण टीम तैनात असेल.
• रुग्णांसाठी औषध, दोन वेळचे जेवण आणि नाश्ता अशी सगळी सोय आहे.
• सर्वात महत्वाचे म्हणजे नंदकुमार भोईटे यांनी हे सर्व स्वखर्चातून केले असून, लोकांसाठी मोफत सेवा उपलब्ध केली आहे.
पाहा व्हिडीओ: