मुक्तपीठ टीम
नांदेडमधील ‘होला-मोहल्ला’ मिरवणुकीत पोलिसांवर हल्ला करण्याच्या प्रकरणात ४०० हून अधिक जणांविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत १८ लोकांना अटकही करण्यात आली आहे. या हल्ल्यात ४ पोलिसांना गंभीर दुखापत झाली आहे. सर्वांवर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
‘होला-मोहल्ला’ मिरवणूक रोखण्यासाठी पोलीस गेले होते तेव्हा पोलिस पथकावर तलवारी, दगड आणि दंड्यांनी हल्ला करण्यात आला. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता या मिरवणुकीस परवानगी नव्हती. समाजकंटकांनी एसपी आणि डीएसपीच्या गाड्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यादरम्यान शीख महिला दगडफेक देखील करताना दिसल्या. जमाव अचानक गुरुद्वाऱ्यात बाहेर निघाला आणि पोलिसांनी लावलेले बॅरिकेड तोडण्यात आले. हा जमाव तैनात केलेल्या पोलिसांवर तुटून पडला. या हिंसेत अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे.
गुरुद्वारा समितीवर विश्वासघाताचा आरोप
नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक (डीआयजी) निसार तांबोळी म्हणाले की, होला-मोहल्लाची मिरवणूक नांदेडच्या हुजूर साहिब गुरुद्वारा शीखांद्वारे काढली जाते. महाराष्ट्रात कोरोना साथीच्या आजारामुळे ही मिरवणूक काढू दिली गेली नव्हती. याची माहिती गुरुद्वारा समितीला देण्यात आली होती. त्यांनी आमच्या सूचनांचे पालन करून गुरुद्वाराच्या आवारात कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले होते.
रस्त्यावर मिरवणूक काढण्यासाठी अडून बसले
सूचना असूनही सायंकाळी चार वाजता निशान साहिब यांना गुरुद्वारा गेटवर आणण्यात आले. पोलिसांनी नकार दिल्यावर शीख तरुणांनी वाद घातला आणि अचानक ४०० हून अधिक लोक हातात शस्त्रे घेऊन पोलिसांवर तुटून पडले. या हल्ल्यात जखमी झालेल्या कॉन्स्टेबलची प्रकृती चिंताजनक आहे.
Incident happened in #Nanded #lalqilla is threat to the protectors of democracy.. Government should hvae to give law and order to police force to curb on this#nanded pic.twitter.com/5BjeS4na95
— Sanket Prakash Thakur (@SanketPrakashT1) March 30, 2021
उद्धव जी, वसूली नको, कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष्य द्या.#Nanded #नांदेड़ pic.twitter.com/JhI7Iq00bW
— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) March 30, 2021