मरणानंतरही मृतदेहाची अवहेलना झाल्याचा प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला आहे. एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे डुकरांनी लचके तोडल्याची थरारक घटना समोर आली आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या गजबलेल्या परिसरात हा प्रकार घडला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडाली आहे.
आज सकाळची घटना-
विष्णूपुरी येथील कै.शंकरराव चव्हाण जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाजूच्या एका कचरा कुंडीजवळ काही डुकरं एका मृतदेहाचे लचके तोडत असल्याची घटना आज सकाळच्या सुमारास समोर आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या व्हिडिओत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ काही डुकरं दिसत आहेत. ही डुक्करे एका मृतदेहाचे लचके तोडताना दिसत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या मरणानंतर त्याच्या मृतदेहाची अशा प्रकारे विंटबना झाल्याने समाजसेवी संघटनाकडून संताप व्यक्त केला जात आहे.
शासकीय रुग्णालयाच्या बाजूच्या एका कचरा कुंडीजवळ काही डुकरे एका मृतदेहाचे लचके तोडत असल्याची घटना आज सकाळच्या सुमारास समोर आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
घटनेची माहिती कळताच, स्थानिक पोलीस हेडकॉन्स्टेबल यांनी सांगितले की, “आम्हाला पोलीस ठाण्यातून मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच, आम्ही घटनास्थळी पोहोचलो. सरकारी रूग्णालयाच्या गेट समोरील रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात मृतदेहाची खाल्लेली हाडं दिसत होती. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन गेलो आहोत.”
पाहा व्हिडिओ :