Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सेवादल काँग्रेसचा कणा आहे!”: नाना पटोले

July 31, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patole

मुक्तपीठ टीम 

देश पारतंत्र्यात असताना जशी परिस्थिती होती तशीच परिस्थीती सध्या देशात आहे त्यामुळे सेवादलाची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. सेवादलाने देश जोडण्याचे काम केले आहे परंतु काही शक्ती देशाला तोडण्याचे काम करत आहेत. या जातीयवादी, देशविघातक शक्तींना रोखण्याचे काम सेवादलच करु शकते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, सुभाषचंद्र बोस, राजीव गांधी हे सुद्धा सेवादलाचे अध्यक्ष होते. सेवादल हा काँग्रेसचा कणा आहे. देशातील सध्याची परिस्थीती पाहता सेवादलावर मोठी जबाबदारी असून देश तोडण्याऱ्या शक्तींना रोखा व केंद्रातील सरकारचे अपयश तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

congress

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे,  सेवादल महाराष्ट्रचे प्रभारी लालजी मिश्रा, अखिल भारतीय सेवादल समन्वयक व मध्य प्रदेशचे प्रभारी कृष्णकांत पांडे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशाची सेवा करण्याचे व्रत घेऊन नारायण हर्डीकर यांनी नागपुरात सेवादलाची स्थापना केली. काँग्रेसचा विचार हा देशहिताचा विचार असून तो शेवटच्या माणसापर्यंत पोहवण्याचे काम सेवादलाने केले आहे. सेवादलाने देश जोडण्याचे काम केले आहे. इंग्रजांच्या विरोधात सेवादलाने संघर्ष केला. आता देशातील सत्तेविरोधातच संघर्ष करण्याची वेळ आली आहे. पंडित जवाहरलाल नेहरुंनी या देशाच्या विकासाची पायाभरणी केली. मोठ-मोठे प्रकल्प उभे केले,  संस्था निर्माण केल्या. नेहरुंनी उभे केलेले सर्व वैभव एक एक करुन विकण्याचे काम सध्या केले जात आहे. इतिहास पुसण्याचे कामही केले जात आहे. या शक्तींना थोपवण्यासाठी सेवादलाने नव्या ताकदीने काम केले पाहिजे. महाराष्ट्रात सेवादलाचे काम अशा पद्धतीने करा की त्याची दखल देशपातळीवर घेतली पाहिजे.

congress
महाराष्ट्रात सेवादलाने कोरोना काळात लोकांना मदत केली, अन्नधान्य, किराणा किट, औषधे पोहचवली, अतिवृष्टी व पुराच्यावेळीही लोकांच्या मदतीला सेवादल धावले. रक्तदान शिबीरे घेतली, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहिम राबवण्यासह अनेक कार्यात सेवादल अग्रभागी राहिले आहे अशी माहिती सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी दिली.


Tags: Atul Londhebhai jagtapCongressMaharashtrasevadalअतुल लोंढेनाना पटोलेमहाराष्ट्रमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
Previous Post

अकरा वेळा आमदार, तरीही स्फटिकासारखे निर्मळ…गणपतराव देशमुख!

Next Post

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह नेत्यांची गणपतराव देशमुख यांना शब्दांजली

Next Post
ganpatrao deshmukh

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह नेत्यांची गणपतराव देशमुख यांना शब्दांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!