मुक्तपीठ टीम
वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करायचा की नाही, यावर वेगवेगळे राजकारण होत असताना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. “लॉकडाऊन करण्यात कोणत्याही सरकारला आनंद वाटत असेल का? मी कोणत्याही पक्षाचा नाही. पण जर आपल्याला मृत्यू टाळायचे, असेल तर हे गरजेचं आहे,” असे नाना पाटेकर म्हणाले.
नाना पाटेकर पुण्यातील रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाना पाटेकर यांना राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी स्पष्ट शब्दात आपलं मत मांडलं.
काय म्हणाले नाना पाटेकर?
• राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
• प्रत्येकाने वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन केले पाहिजे.
• माझ्यासह सर्वांनी नियमांचं पालन केले पाहिजे.
• लॉकडाऊन करण्यात कोणत्याही सरकारला आनंद वाटत असेल का?
• मी कोणत्याही पक्षाचा नाही. पण जर आपल्याला मृत्यू टाळायचे, असेल तर हे गरजेचं आहे.
लॉकडाऊनमध्ये गरजूंसाठी काय करायचं?
सरकारनं लॉकडाऊन लावण्यापूर्वी काही जबाबदारी घ्यायला पाहिजे का? या प्रश्नावर नाना पाटेकर म्हणाले…
• सरकार कुठपर्यंत मदत करणार?
• सरकारला एक मर्यादा आहेत.
• ते त्यांच्या परीने मदत करतच राहणार आहेत.
• पण आपण मी, तू सर्वांनी काहीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
• एकाने १०० लोकांची नव्हे, तर एक-दोन अशा लोकांची जबाबदारी घेण्यासाठी या कठीण काळात पुढं आलं पाहिजे.
• आपण स्वतःला नशीबवान समजले पाहिजे की, अशा कठीण काळात कोणासाठी तरी काही करू शकतो.