मुक्तपीठ टीम
देशावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला आवडेल असा एक चांगला निर्णय सरकारनं घेतला आहे. आता जम्मू-काश्मीर राज्यातील १८ शाळांना देशासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांची नावं दिली जाणार आहेत. त्यामुळे नव्या पिढीला स्फुर्तिदायी वातावरणात भविष्य घडवण्याची संधी लाभणार आहे. सरकारने यासाठी मान्यता दिली आहे. सामान्य प्रशासकीय विभाग प्रधान सचिव, मनोज कुमार द्विवेदी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ही नावं दिली जाणार आहेत.
जे जवान शहीद झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार त्यांची नावं शाळांना देण्यात येतील. शाळांबरोबरच सार्वजनिक ठिकाणे, रुग्णालये इत्यादी ठिकाणांनाही ही नावं देण्यासाठी प्रकिया सुरू करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर हे राज्य एकीकडे दहशतवादाच्या सावटाखालील. तरीही तिथं असणारा एक वर्ग आजही देशासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतो. त्यांच्यापैकी काहींनी आपल्या देशासाठी प्राणार्पण केले आहे. अशांपैकीच १७ हुतात्म्यांची नावं शाळांना देण्यात येणार आहेत.
कोणत्या शाळांचा असणार समावेश? आणि कोणत्या शूरवीरांची नावं दिली जाणार?
१. अनंतनाग येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाचे नाव स्वानंद कौल प्रेमी यांच्या नावाने तर, गुरेज येथील वानपोरा शासकीय माध्यमिक विद्यालयाचे नाव शहीद रियाझ अहमद लोन यांच्या नावावर ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
२. शासकीय माध्यमिक शाळा चंदनबारी- शहीद रायफलमन मोहम्मद सफिर खान
३. शासकीय माध्यमिक विद्यालय डब- शहीद पॅरा ट्रूपर शाबीर अहमद मलिक
४. कुपवाडा बॉईज मिडल स्कूल शहीद- रायफलमन अब्दुल हमीद चारा
५. उच्च माध्यमिक विद्यालय कुंडलियाला- शहीद हेड कॉन्स्टेबल अब्दुल रशीद
६. शासकीय माध्यमिक शाळा बांडे मोहल्ला हंदवाडा- शहीद सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल गुलाम मुस्तफा
७. उच्च प्राथमिक शाळा काश्मिरी मनिगाह- शहीद हेड कॉन्स्टेबल शेराज अहमद
८. शासकीय माध्यमिक शाळा गढी- शहीद कॉन्स्टेबल राजिंदर कुमार
९. शहीद कॉन्स्टेबल राज कुमार- शासकीय माध्यमिक विद्यालय, जगानू
१०. शासकीय मुलींचे माध्यमिक विद्यालय मुट्ठलाल अलनबास- शहीद कॉन्स्टेबल नसीब सिंह
११. शासकीय माध्यमिक शाळा बग्गा- शहीद हवालदार एसपीओ जलाल दिन
१२. मिडल स्कूल बट पुरा डूल- शहीद हवालदार शमीम अहमद
१३. मिडल स्कूल सौंदर- शहीद हेड कॉन्स्टेबल रघुनाथ
१४. मिडल स्कूल चटेयारी- शहीद शिपाई जोगेंद्र सिंह १५. प्राथमिक शाळा पाटी- शहीद हवालदार सरतुल सिंह
१६. सरकारी माध्यमिक शाळा खैरी- शहीद कॉन्स्टेबल राजकुमार
१७. सरकारी प्राथमिक शाळा डब दित्ता- शहीद कॉन्स्टेबल जगदेव सिंह
या सर्व शूरवीरांच्या नावावर शाळांना नावं देण्यात येईल.