Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विधान परिषदेच्या दोन जागांसाठी मतदान: नागपुरात ऐनवेळी उमेदवार बदलाची ‘हात’चलाखी, अकोल्यात आघाडी-भाजपा लढत!

December 10, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Nagpur Akola- Buladana constituency voting today

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या दोन जांगावर मतदान सुरु आहे. नागपूर आणि अकोला-बुलडाणा -वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र नागपूरमध्ये या निवडणुकीत एक भलतंच वळण आलं आहे, काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलण्याची नामुष्की आली आहे. भाजपातून आलेले छोटू भोयर यांची उनेदवारी बदलून ती ऐनवेळी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने समर्थन दिलं आहे.तर भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपाचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होत आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तिथं वंचितच्या भूमिकेवर निकालाचा तराजू दोलायमान आहे.

 

नागपूरमध्ये काँग्रेसचा बदलाचा झटका

  • नागपूरमध्ये काँगेसने भाजपा नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना उमेदवारी दिली होती, पण ऐनवेळी उमेदवार बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले.
  • भाजपनं विधानसभेत तिकीट कापलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली आहे.
  • मतदार फुटू नयेत म्हणून भाजपकडून कमालीची सतर्कता बाळगली होती.
  • मात्र,मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला.

 

भाजपामधून आलेले छोटू भोयर यांची प्रतिक्रिया

  • निवडणूक लढवण्यासाठी मी असमर्थता दर्शवली नाही.
  • काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या पत्रकात मात्र मी असमर्थता दर्शवली असल्याचं म्हटलंय.
  • पण जर काँग्रेसला वाटत असेल की ही निवडणूक छोटू भोयर यांच्या नावावर जिंकू शकत नाही.
  • त्यामुळे जर त्यांनी उमेदवार बदलला असेल तर मी त्या निर्णयाचा स्वीकार करतो.
  • मंगेश देशमुख यांच्या विजयासाठी मी जे जे करु शकतो ते करणार आहे.
  • मात्र, पक्षानं असं का केलं याबाबत प्रदेशाध्यक्षांशी बोलल्यावरच सांगेन.

 

अकोला बुलडाणा

  • अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होत आहे.
  • अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही.
  • या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी व अपक्ष मतदार हे विजयाचा कौल ठरवणार आहेत.

 

एकूण कोणाकडे किती मते?

  • या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे काँग्रेस १९०, शिवसेना तर राष्ट्रवादी कॉंग्रेस ७६ असे एकूण ३९६ मते आहेत.
  •  भाजपाकडे २४४ मते आहेत.
  • दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही.
  • या स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचित बहुजन आघाडीचे ८५ तर अपक्ष १७२ असे एकूण २५६ मतदार आहेत.

Tags: Akola-Buldhana-WashimChotu BhoyarCongressnagpurअकोला-बुलडाणा -वाशिमकाँगेसछोटू भोयरनागपूरस्थानिक स्वराज्य संस्था
Previous Post

जात पंचायत विरोधी देशव्यापी कायदा व्हावा, राज्यसभेत झाली मागणी

Next Post

सांगली शहरात लसीकरणाचा विक्रम, महालसीकरण मोहिमेत एका दिवसात ११ हजार ८८५ डोस!

Next Post
vaccination in Sangli city

सांगली शहरात लसीकरणाचा विक्रम, महालसीकरण मोहिमेत एका दिवसात ११ हजार ८८५ डोस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!