मुक्तपीठ टीम
देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणाला विचारात घेतलं नाही किंवा कुणाच्याही खात्यात पैसे जमा करण्याचा कार्यक्रम केला नाही. नुसत्या राजकारणासाठी हे करा ते करा बोलणं योग्य नाही टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.
भाजपचे नेते लॉकडाऊनमधील वेगवेगळ्या पॅकेजबाबत बोलत असून त्यांच्या या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रात अर्थव्यवस्था एकदम ठप्प झाली पाहिजे ही परिस्थिती न करता काय काय सुरु ठेवता येईल किंवा कुणाकुणाला काय मदत करता येईल याबाबत आजपर्यंत चर्चा होऊन निर्णय होईल परंतु जे काही भाजपचे लोक पैसे द्या पैसे टाका सांगत आहेत ते योग्य नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान राज्यातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे गरजेचे आहे ते निश्चितपणे सरकार करेल असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.