मुक्तपीठ टीम
माइल्स (Myles) या कार सबस्क्रिप्शन आणि शेअरिंग प्लॅनचा व्यवसाय करणाऱ्या मोबिलिटी कंपनीने आता एक भन्नाट ऑफर दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना दरवर्षी त्यांच्या कार बदलता येईल. माइल्सने ‘चेंजिंग कार एव्हरी इयर’ योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहक दरवर्षी त्यांची कार बदलू शकतात. कंपनी पुढील १२ महिन्यांत या ऑफर अंतर्गत ५००० कार लाँच करण्याचा विचार करत आहे.
कशी असणार ‘चेंजिंग कार एव्हरी इयर’ योजना?
- ग्राहकांना कार निवडावी लागेल
- योग्य कालावधी निवडावा लागेल (एक ते चार वर्षांच्या दरम्यान) आणि शुल्क भरावे लागेल.
- ग्राहकाने ऑनलाइन करारावर स्वाक्षरी केल्यानंतर कार वितरित केली जाते.
वाहनाच्या तात्पुरत्या मालकी/बदली/परताव्यासाठी पूर्व-
- निर्धारित रकमेमध्ये शून्य खर्चावर विमा संरक्षण
- शेड्यूल किंवा अनियोजित मेंटनेंस कवर
- शून्य खर्चावर दरवर्षी दोन रोड साइड असीस्टेंस
- FASTag
- स्टैंडर्ड कार अॅक्सेसरीजचा समावेश आहे.
- जिरो मेंटनेंस कॉस्ट आणि डाउन पेमेंटसह, या ऑफरचे उद्दिष्ट एक फ्लेक्सीबल ओनरशीप एक्सपिरीयंस देने आहे.
माइल्सचे लक्ष्य आणि लक्ष युवा वर्ग!
माईल्सच्या संस्थापक आणि सीईओ साक्षी विज म्हणाल्या, “आमचा प्रयत्न आहे की प्रत्येकाकडे कार असली पाहिजे. त्यानुसार आम्ही सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून माईल्स त्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि आता तरुण पिढीला कार घेण्याच्या दायित्वाची जाणीव झाल्यामुळे, ते OTT प्लॅटफॉर्मप्रमाणेच कारचेही सबस्क्रिप्शन घेण्यासही तयार असतील. आमच्या स्मार्ट सबस्क्रिप्शन प्रोग्रामद्वारे, आम्ही त्यांच्यासाठी प्रक्रिया सुलभ करत आहोत. आमचा उद्देश तरुण पिढीला हे समजवणे आहे की कोणत्याही अनावश्यक त्रासाशिवाय कारचे सबस्क्रिप्शन घेणे किती सोपे आहे.”