Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सुषमा अंधारेंनंतर खासदार राजन विचारेंनाही धोका! काही बरं वाईट झाल्यास शिंदे-फडणवीसांना ठरवलं जबाबदार!

October 18, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Thackeray Group MP Rajan Vikhare

मुक्तपीठ टीम

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या संरक्षणात कपात करण्यात आली आहे. राजन विचारे यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. या संतापातून राजन विचारेंनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. पोलिस महासंचलकांना पाठवलेल्या या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पत्रात राजन विचारेंनी स्वत:च्या आणि कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले…

  • मला आणि माझ्या कुटुंबांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास मुख्यमंत्री आणि फडणवीस जबाबदार असतील.
  • माझ्या पोलीस सरंक्षणात वाढ करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
  • सूडबुद्धीने माझ्या संरक्षणात कपात केली आहे.
  • त्यामुळे माझ्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून दुर्दैवाने काही घडले तर त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार असतील, असं या पत्रात राजन विचारे यांनी नमूद केले आहे.

ठाण्यात शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापनेनंतर शिंदे-ठाकरे गट आमनसामने!

  • शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटातील पदाधिकारी आणि नेत्यांना मोठ्या प्रमाणात पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
  • आता ठाण्यातील ठाकरे गटातील खासदार राजन विचारे यांच्या अंगरक्षक आणि पोलीस सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे. यामुळे विचारे यांनी संताप व्यक्त केला आहे.
  • राजन विचारे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांची भेट घेऊन पत्र व्यवहार केला आहे. कपात केलेले अंगरक्षक पोलिसांची सुरक्षा पुन्हा देण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदें यांच्या नेतृत्वाखालील बंडानंतर माझगाव, कल्याण येथे शिवसैनिकांवर हल्लेही झाले होते. त्यानंतर ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेनंतर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील त्यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता खासदार राजन विचारेंनी त्यांच्याही जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिवसैनिक, शिवसेना नेते, पदाधिकारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.


Tags: muktpeethPolice ProtectionShinde GroupShinde-BJP SattaShiv Sena Uddhav Balasaheb ThackerayThackeray Group MP Rajan VikhareThane Lok Sabha ConstituencyThane Police Commissionerघडलं-बिघडलंठाकरे गट खासदार राजन विचारेठाणे पोलीस आयुक्तठाणे लोकसभा मतदारसंघपोलीस संरक्षणमुक्तपीठशिंदे गटशिंदे-भाजप सत्ताशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Previous Post

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा २० ऑक्टोबरपासून शुभारंभ

Next Post

तलाठी भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Next Post
महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठक 1

तलाठी भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!