मुक्तपीठ टीम
राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्याविरोधात सातत्यानं घोटाळ्यांच्या आरोपांचं अस्त्र सोडणाऱ्या किरीट सोमय्यांविरोधात आता आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. केवळ राजकीय सूडबुद्धीतून सोमय्या आघाडीमागे ईडीची पिडा लावत असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. आता आघाडीचे नेते कायदेशीर कारवाईबरोबरच राजकीय आरोपही करून सोमय्यांना उत्तर देत आहेत.
अजित पवार
- अजित पवार यांनी ते रोज काही तरी आरोप करणार, त्यावर रोज काय बोलणार, अशा शब्दात सोमय्यांवर निशाणा साधला.
नाना पटोले
- भाजप लोकांची दिशाभूल करत आहेत.
- लोकांचं प्रश्न सोडवत नाही.
- केंद्र सरकारवर जनतेची नाराजी आहे.
- त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपची नौटंकी सुरू आहे.
- म्हणूनच किरीट सोमय्या स्टंट करत आहेत. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचं काम भाजप करत आहेत.
- चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला गांभीर्याने घेत नाही.
- तसेच आमच्या मंत्र्यांची चूक नसल्याने आम्हाला घाबरण्याचं कारणही नाही.
- किरीट सोमय्यांनी भाजप नेत्यांचेही भ्रष्टाचार उघड करावेत.
- त्यांना महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद मिळतील. सोमय्या जे कागद घेऊन फिरत आहेत ते जुनेच आहेत.
- त्यांना निवडणुकीचं तिकीटही भाजपनं दिलं नव्हतं
संजय राऊत
- किरीट सोमय्यांनी केंद्रसरकारवर बोलावं.
- इतर राज्यातील भाजपची सरकारं आहेत. त्यावरही बोलावं.
- तुमच्याकडे आरोप करण्यापूर्वी पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस आहे, यंत्रणा आहेत, लाचलूचपत विभाग आहे.
- या संस्था पक्षपात न करता काम करत असतात.
- पण तुम्ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, त्यांच्या आदेशाने केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांवर आरोप करत आहात.
- त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रयत्न होत असेल तर राज्याचं गृहमंत्रालय कारवाई करत असतं. कालपासून मी पाहतो ही राज्याच्या गृहमंत्रालयाने केलेली कारवाई आहे.
- त्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज नाही.
- मी मुख्यमंत्र्यांशी बोललो.
- त्यांनी सांगितलं या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही.
- गृहमंत्रालयाला काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी कारवाई केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
- सोमय्या यांनी चंद्रावर जाऊन पाहावं.
- त्यांनी मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्या. या देशात लोकशाही आहे.
- व्यक्तिस्वातंत्र्य आहे. यापूर्वी अनेकांनी असे आरोप केले.
- आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला कोणी टाळं लावू शकत नाही.
- विरोधी पक्ष आहे.
- ते आरोप करू शकतात.
- पण शेवटी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर त गृहमंत्रालयाला कारवाई करावी लागते.
- त्यानुसार कारवाई झाली आहे.
- कुणाला केंद्राच्या इशाऱ्यावर आरोप करायचेच असेल तर त्याला आम्ही काय करणार.
- त्यांना आरोप करू द्या, आरोप कुणावर होत नाही. आरोप मोदींवर होतात, अमित शहांवर होतात. भाजप शासित राज्यातील नेत्यांवर होतात.
- सध्या राजकारणात आरोप करणं ही फॅशन झाली आहे.
- त्यांनी आरोप करत राहावं.
- त्यांना कळेल लवकर आमचा रंग कोणता आहे. कळेल.
- कायदेशीर कारवाई एखाद्यावर होते.
- तेव्हा रंगाचा प्रश्न कुठे येतो?
- या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास रंग बघून कारवाई होत नाही.
- आमचा रंग कोणता आणि तुमचा रंग कोणता असं होत नाही.
- शिवसेनेवर असे आरोप करण्यापूर्वी आपले अंतरंग झाकून पाहावं.
हसन मुश्रीफ
- हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.
- सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
- किरीट सोमय्या हे चुकीचे आरोप करत आहेत. किरीट सोमय्या यांची स्टंटबाजी कशासाठी? कोणाला विनाकारण बदनामी करण्याचा.
- प्रयत्न आहे. त्यांचे मास्टरमाइंड चंद्रकांत पाटील आहेत.
- पाटील यांच्या सांगण्यावरूनच ते माझ्यावर आरोप करत आहेत.
- सोमय्यांनी माझ्यावर आधी एका घोटाळ्याचा आरोप केला होता.
- त्यामुळे मी त्यांच्यावर १०० कोटीचा दावा ठोकणार आहे.
- त्याची कागदपत्रं अंतिम टप्प्यात आहे.
- आता त्यांनी माझ्यावर नवा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आणखी ५० कोटींचा म्हणजे एकूण १५० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.
सचिन सावंत
- सोमय्या दुसऱ्यांच्या मालमत्ता तिसऱ्याच्या म्हणून दाखवतात, ती त्यांची जुनी सवय आहे.
- कोणाच्याही जागेकडे बोट दाखवून बेनामी म्हणतात म्हणून जनतेत भीती आहे.
- याचकरिता बंदी घातली आहे.
- राष्ट्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या शाखा झाल्या असतानाही त्यांचे काम भाजपा करणार का?
- सोमय्यांनी नौटंकी कायद्याच्या चौकटीत करावी”, असं सचिन सावंत म्हणाले.