Thursday, May 22, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

‘टीव्हीएस वन-मेक चॅम्पियनशिप फॉर वूमन’ शर्यतीची निवड फेरी २७ मार्चला मुंबईत

March 23, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
TVS

मुक्तपीठ टीम

टीव्हीएस मोटर कंपनीची टीव्हीएस रेसिंग ही फॅक्टरी रेसिंग टीम आहे. टीव्हीएस रेसिंगतर्फे टीव्हीएस वन-मेक चॅम्पियनशिप फॉर वूमन आणि नवोदित (रुकी) श्रेणीसाठीच्या २०२२च्या अर्बन एडिशन आयोजित करण्यात आली आहे. त्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या शर्यतीची निवड फेरी २७ मार्च २०२२ रोजी मुंबई आहे. रायडर्सना स्पर्धेतील आपल्या मोटरसायकलींची व्यवस्थित माहिती मिळण्यासाठी पूर्ण-दिवस प्रशिक्षण शाळाही असणार आहे. टीव्हीएस रेसिंगच्या राष्ट्रीय विजेत्यांद्वारे ही प्रशिक्षण शाळा असेल.

 

महिला वर्गात सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या स्पर्धक रायडर्स टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० फोर व्ही (TVS Apache RTR 200 4V) आणि टीव्हीएस अपाचे आरआर २०० (TVS Apache RR 200) या मोटरसायकल्सवर अनुभवी श्रेणीमध्ये आपल्या स्व-क्षमतेची चाचणी घेणार आहेत. भारतातील तरुण मोटरस्पोर्ट प्रतिभेला पोषक वातावरण आणि प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी ‘रुकी श्रेणी’ हे एक अपरिहार्य व्यासपीठ असून ते वय वर्षे ११ ते १८ वयोगटातील तरुण रायडर्सकरीता खुले ठेवण्यात आलेले आहे.

 

प्रत्येक श्रेणीतील आघाडीच्या स्थानावरील वीस चालक प्रत्येक शहरातून आपल्या सर्वोत्तम लॅप वेळा, शारीरिक तंदुरुस्ती आणि रेसिंग क्षमतांच्या आधारे निवडले जातील. निवडीची अंतिम फेरी चेन्नई येथे मे २०२२ मध्ये मद्रास मोटर रेस ट्रॅक (MMRT) येथे होईल. मुंबई येथील निवड फेरी अजमेरा इंडीकार्टींग येथे पार पाडली जाणार आहे. इच्छुक उमेदवार +९१ ९६३२२५३८३३ या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करू शकतात.

निवड झालेल्या स्पर्धकांना विजेतेपदासाठी पाच फेऱ्यांमध्ये स्पर्धा पूर्ण करावी लागणार आहे, ज्यामध्ये टीव्हीएस अपाचे RTR 200 4V आणि TVS Apache RR 200 या मोटरसायकल्स वापरून ते शर्यतीत सहभागी होतील. वर्ष २०२२ मधील इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिप (INMRC) सुरू होण्यापूर्वी शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यासाठी आणि स्पर्धकांच्या रेसिंग कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी टीव्हीएस रेसिंगतर्फे चेन्नईतील अंतिम निवड फेरीच्या वेळी, चालक स्पर्धकांना राष्ट्रीय पातळीवरील विजेत्या चालकांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली विशिष्ट प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

निवड फेरीचा तपशील:

शहर तारीख ठिकाण हजर होण्याची वेळ प्रवेश शुल्क कागदपत्रे प्रशिक्षक सुरक्षा (आवश्यक)

मुंबई २७ मार्च २०२२ अजमेर इंडीकार्टिंग सकाळी ८.०० वाजता महिला श्रेणी:
रू. १५००/-
नवोदित रुकी) श्रेणी:
रू. १६००/- वाहन चालविण्याचा परवाना हॅरी सिल्व्हेस्टर, जगन कुमार, के वाय अहमद आणि ऐश्वर्या पिसे वायसरसह संपूर्ण चेहरा झाकणारे हेल्मेट आणि डीओटी व ईसीई मान्यताप्राप्त डबल डी रिंग पट्टा
(मर्यादित रेसिंग सूट्सच उपलब्ध असतील)

 

टीव्हीएस वन-मेक चॅम्पियनशिप महिला वर्ग: निवडीचे निकष

  • सहभागींकडे दुचाकी वाहन चालविण्याचा वैध परवाना असावा.
  • १८ वर्षाखालील स्पर्धकांनी कोणत्याही रेसिंग प्रशिक्षण शाळेतून लेव्हल-१ FMSCI प्रमाणित प्रशिक्षण घेतलेले असावे आणि निवडीच्या ठिकाणी स्पर्धकांच्या पालकांनी त्यांच्या सोबत असावे.

 

टीव्हीएस वन-मेक चॅम्पियनशिप नवोदित (रुकी) श्रेणी: निवडीचे निकष

  • सहभागी स्पर्धकांचे वय १८ वर्षाखालील असावे (जानेवारी २००५ मध्ये किंवा त्यानंतर जन्मलेले). कोणत्याही रेसिंग प्रशिक्षण शाळेकडून प्राप्त झालेले लेव्हल-१ FMSCI प्रमाणित प्रशिक्षण अनिवार्य आहे
  • तपशीलवर माहितीसाठी कृपया आमच्याशी +९१ ९६३२२५३८३३ येथे संपर्क साधा.

 

पाहा व्हिडीओ:

 

 


Tags: good newsmuktpeethmumbaiTVSTVS One-Make Championship for Women Raceचांगली बातमीटीव्हीएसटीव्हीएस वन-मेक चॅम्पियनशिप फॉर वूमन शर्यतमुक्तपीठमुंबई
Previous Post

केंद्र सरकारची अल्पसंख्यांक महिलांमध्ये नेतृत्व विकासासाठी ‘नई रोशनी योजना’

Next Post

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियात ७५ जागांवर करिअर संधी

Next Post
Credit Guarantee Corporation of India

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियात ७५ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!