मुक्तपीठ टीम
मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग मंदावत आहे. मुंबईतील झोपडपट्ट्यांनी कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. मनपाच्या २४ वॉर्डपैकी १८ वॉर्डमध्ये एकही कंटेनमेंट झोन उरलेला नाही. तर एका वॉर्डमध्ये एक, दोन वॉर्डमध्ये २, एका वॉर्डमध्ये ३ अशा सहा प्रभागांत फक्त २२ कंटेनमेंट झोन शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील कोणत्या भागात किती कंटेनमेंट झोन?
- के/पूर्व – अंधेरी पूर्व – ८
- आर/दक्षिण – कांदिवली – ६
- एस – भांडूप – ३
- टी – मुलुंड – २
- एम/पश्चिम – चेंबूर – २
- ई – भायखळा – १
दाटीवाटीच्या भागात कोरोना आटोक्यात
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर मुंबई मनपासाठी आव्हान ठरलेल्या उत्तर मुंबईतील आर/मध्य बोरिवली, आर/उत्तर दहिसर, पी/दक्षिण गोरेगाव, पी/उत्तर मालाड, के/पश्चिम अंधेरी पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांमध्ये आता एकही कंटेनमेंट झोन नाही.
याशिवाय ए वॉर्ड, बी डोंगरी, सी चिराबाजार, काळबादेवी, डी ग्रँटरोड, एफ उत्तर शीव-वडाळा, पिंग सर्कल, एफ दक्षिण परळ, एल्फिन्स्टन, जी/उत्तर धारावी, दादर, माहीम, एच पूर्व वांद्रे पूर्व, एच/पश्चिम वांद्रे पश्चिम, एल कुर्ला, एन घाटकोपर या वॉर्डमधील झोपडपट्टय़ांमध्ये एकही कंटेनमेंट झोन नाही.
कोरोनामुक्तीकडे मुंबईतील झोपडपट्ट्या कशा गेल्या?
• मुंबईत गेल्या मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता.
• त्यानंतर दाटीवाटीने वसलेल्या आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीसह कुर्ला, वरळी कोळीवाडे, घाटकोपर, मुलुंड, अंधेरी, वांद्रय़ाच्या झोपडपट्टी भागात कोरोना रुग्णसंख्या वाढली.
• मुंबईतील झोपडपट्टी भागात ‘कोरोना हॉटस्पॉट’ निर्माण झाला होता.
• त्यामुळे हा संसर्ग कसा रोखायचा असा सवाल मनपासमोर निर्माण झाला होता.
• मात्र पालिकेने ‘मिशन झीरो’सह ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आला.
• घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, औषधोपचार, सॅनिटायझर, जनजागृतीच्या माध्यमातून प्रभावी काम केल्यामुळे झोपडपट्टीतील कोरोना वेगाने नियंत्रणात आला.