मुक्तपीठ टीम
मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस स्पेशलची फेरी शनिवारपासून सुरू झाली. स्पेशल यासाठी की आता या मार्गावर एक्स्प्रेसला प्रथमच व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. व्हिस्टाडोम कोचमधील सर्व ४४ सीट्स आज बुक होत्या. काचेच्या कोचमधून प्रवाशांना निसर्गरम्य सौंदर्याचा आणि अनुभवाचा चौफेर आनंद लुटता आल्यानं प्रत्येकाच्या मनात ते गाणं रुंजी घालत असेल…हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट!
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कोचजवळच खास सेल्फी पॉईंट उभारला होता. तेथे प्रवाशांनी सेल्फी घेतल्या. यावेळी प्रवाशांनी कोचच्या आतील भागाप्रमाणे दिसणारा एक केकही कापला.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट केले की, “मुंबई-पुणे मार्गावर, स्पेशल डेक्कन एक्स्प्रेसमध्ये पारदर्शक आणि मोठ्या खिडक्या असलेले व्हिस्टाडोम कोच प्रवासाचा आनंद वाढवत आहेत. यामध्ये प्रवास करणारे त्यांचे अनुभव सांगत आहेत. प्रवाशांच्या जागतिक दर्जाच्या अनुभवासाठी रेल्वे सतत प्रयत्नशील आहे. ”
Enabling a World Class Travel Experience: A glimpse of the first trip of the fully booked Vistadome coach on the Mumbai-Pune Deccan Express Special Train.
Passengers can enjoy unhindered views of rivers, valley, waterfalls while experiencing the scenic beauty of Western Ghats. pic.twitter.com/XSShdhF1LT
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 26, 2021
प्रवाशांचे अनुभव
पत्नी व मुलासह उमेश मिश्रा प्रवास करीत होते त्यांनी पियुष गोयल यांचे आभार मानले की फक्त परदेशात उपलब्ध व्हिस्टाडोम कोचची ओळख करुन दिली. मोठ्या खिडक्या आणि फिरणाऱ्या आसनांमुळे त्यांच्या मुलास संपूर्ण प्रवासाचा आनंद घेता आला.
मुंबई-पुणे रेलमार्ग पर, विशेष डेक्कन एक्सप्रेस मे लगे पारदर्शी व बड़ी खिड़कियों वाले विस्टाडोम कोच, सफर का आनंद कई गुना बढ़ा रहे हैं।
प्राकृतिक सुंदरता वाले इस मार्ग पर सफर कर रहे यात्री अपने अनुभव साझा कर रहे हैं। यात्रियों के विश्वस्तरीय अनुभव के लिये रेलवे निरंतर प्रयासरत है। pic.twitter.com/zxj3WF4Urt
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 26, 2021
दुसर्या प्रवाशाने सांगितले की ते मुंबई आणि पुणे दरम्यानचा नियमित प्रवासी असून हा व्हिस्टाडोम कोच जोडल्याने त्यांचा भोर घाटवरील प्रवास आणखी आनंददायक होईल.
प्रथमच व्हिस्टाडोममधून प्रवास करणाऱ्या सुश्री सयाली म्हणाल्या की मोठ्या खिडकीच्या पॅनवरुन त्यांना आनंद लुटता आला आणि पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गाने आनंद द्विगुणित केला. या मार्गावर हा कोच सुरू केल्याबद्दल त्यांनी भारतीय रेल्वेचे आभार मानले.
हिरव्या हिरव्या झाडीत हिरवी हिरवी पानां हिरव्या हिरव्या पानांत वारो गाता गाना…
व्हिस्टाडोम कोचमुळे प्रवाशांसाठी मार्गावरील पुढील ठिकाणे ही डोळ्यांची पारणं फेडणारी ठरणार आहेत:
- माथेरान टेकडी (नेरळ जवळील)
- सोनगीर टेकडी
- उल्हास नदी – उल्हास खोरे
- खंडाळा
- लोणावळा
- दक्षिण पश्चिम घाटावरील धबधबे
- बोगद्यांजवळून जाताना तेथील निसर्गरम्य दृश्य