मुक्तपीठ टीम
संपूर्ण देशात सध्या कोरोनाशी लढा सुरु आहे. त्यात पोलीसही २४ तास कर्तव्य बजावत आहेत. पोलिसांची एक धसमुसळी बाजू नेहमीच पुढे येते. मात्र, आता पोलिसांनी नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी वर्दीत दडलेल्या विनोदबुद्धी उपयोगात आणली आहे. पोलिसांनी #BeBollyGood नावाची मोहीम सुरु केली आहे. ज्याद्वारे कालाकारांचे मिम्स शेअर करुन लोकांना नियमांचे पालन करण्याचे पोलीस आवाहन करीत आहे. त्यांना प्रतिसादही मस्त मिळू लागला आहे.
मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर हे मिम्स पोस्टर शेअर केले असून अभिनेत आणि त्यांच्या नावांसोबत केलेली गंमत लोकांना भावते आहे.
View this post on Instagram
अभिनेते राजेश खन्ना यांच्या नावासोबत केलेला प्रयोग लोकांना खूपच आवडला आहे. हा पोस्टर शेअर करताच लोकांनी त्यावर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव सुरु झाला आहे.
View this post on Instagram
आयुष्मान खुरानाच्या नावाचे पोस्टर तर सर्वांच्या पसंतीस उतरले आहे. मजेशीर बाब म्हणजे या पोस्टरला स्वत: आयुष्मान खुरानाने लाइक आणि कमेंट केली आहे. त्यांनी कमेंटमध्ये लिहिले आहे की, “शहरातील सर्व विक्की डोनर कुपया पोलिसांचे ऐका आणि बाहेर जाण्याचा मूर्खपणा करु नका. तुम्हाला तुम्हाच्या प्यारी बिंदूशी बोलायला भरपूर वेळ मिळेल. आता नाटक करुन समस्येला ओढून घेऊ नका”.
View this post on Instagram
दरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांचे मिम पोस्टरलाही खूप मजेशीर आहे. लोकांनी त्या पोस्टरलाही चांगलीच पसंती दिली आहे.
View this post on Instagram
सिनियर बच्चनप्रमाणेच ज्युनियर बच्चन म्हणजे अभिषेकचंही मिम पोस्टर पोलिसांनी बनवलं आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री कलकीच्या नावाचा वापर करुन मुंबई पोलिसांनी मजेशीर पोस्टर बनले आहे आणि त्याला ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’ हे जोडले आहे.
View this post on Instagram
लोकप्रिय अभिनेत्री विद्या बालन यांच्या नावाशीही खेळत मुंबई पोलिसांनी मिम पोस्टर तयार केले आहे.