मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना संसर्गाच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. मंगळवारी नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी राहिली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणामध्ये वाढच होत आहे. मुंबई मनपाने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यावर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला
• मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहचले आहे.
• राज्यात कोरोनाची दुसरी लाट शिखरावर असताना मुंबईत दिवसाला ११ हजारापर्यंत रुग्ण सापडत होते.
• आता शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र आहे.
• विशेषत: मे महिन्याच्या अखेरपासून परिस्थिती वेगाने सुधारताना दिसत आहे.
• मे महिन्याच्या शेवटच्या २० दिवसांत रुग्ण दुपटीचा कालावधी १६३ दिवसांवरुन ३७० दिवसांपर्यंत जाऊन पोहोचला.
मुंबईतील कोरोना संसर्गाचे विभागही कमी
• एल वॉर्डमध्ये आता केवळ तीन प्रतिबंधित क्षेत्र
• ए, बी, सी, एफ नॉर्थ, एफ साऊथ, जी नॉर्थमध्ये शून्य प्रतिबंधात्मक क्षेत्र
• एल वॉर्डमध्ये २५०६५ रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे.
• बी, सी, एल, एम (पूर्व) या वॉर्डांमध्ये मुंबईच्या इतर वॉर्डांपेक्षा रुग्णसंख्येचे प्रमाण कमी आहे. त्याचाही शोध घेतला जाणार आहे.
शून्य ते पंधरा हजार रुग्णसंख्या असलेले वॉर्ड
• ए, एफ दक्षिण, ई, एम पूर्व, आर उत्तर, जी दक्षिण, एम पश्चिम, एम पूर्व, एल, एफ उत्तर, एच पश्चिम, जी उत्तर,
• एल, डी, आर दक्षिण, एच पश्चिम, पी दक्षिण, के पूर्व, एच पूर्व, जी दक्षिण, टी, एफ उत्तर, एम पूर्व, ई, बी, एम पश्चिम या प्रभागांमध्ये ०.१२ ते ०.१६ टक्के रुग्णसंख्येची साप्ताहिक वाढ नोंदवण्यात आली आहे.
• भायखळा, परळ, मरिन लाइन्स, घाटकोपर, चेंबूर येथे रुग्णदुपटीचा दर साडेपाचशे दिवसांपेक्षा अधिक आहे.