Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“शारीरिक संबंधानंतर लग्नास नकार देणे फसवणूक नाही!” मुंबई उच्च न्यायालयात तरुणाची निर्दोष मुक्तता!

December 21, 2021
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
mumbai high court

मुक्तपीठ टीम

प्रदीर्घ काळ शारीरिक संबंध ठेवल्यानंतर जर कोणी लग्नास नकार देत असेल, तर ती फसवणूक मानता येणार नाही, असे मत पालघरमधील एका तरुणाला दोषी ठरवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निकालात बदल करताना मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. याआधीही उच्च न्यायालयाने सप्टेंबरमध्ये औरंगाबादच्या एका तरुणाच्या दीर्घकाळाच्या शारीरिक संबंधांनंतर विवाहाला नकार म्हणजे बलात्काराचा गुन्ह्याचे कारण ठरू शकत नाही, असा निकाल दिला होता.

 

पालघरमधील गुन्ह्यातील निकाल

  • पालघर येथील एका तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या प्रियकराविरोधात कलम ३७६ आणि ४१७ नुसार बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप प्रेयसीने केला होता.
  • या प्रकरणात, अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी काशिनाथला बलात्काराच्या आरोपातून मुक्त केले होते, परंतु फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.
  • लग्नाच्या आश्वासनावर तीन वर्षे संबंध ठेवल्याप्रकरणी आणि नंतर तो नाकारल्याप्रकरणी न्यायालयाने काशिनाथला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.

 

मुंबई उच्च न्यायालयाकडून फसवणुकीचा आरोपातूनही मुक्तता

  • प्रियकराने या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.
  • न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली.
  • त्यांनी फसवणुकीच्या आरोपातून त्या प्रियकराला निर्दोष मुक्त केले.
  • न्यायमूर्ती प्रभुदेसाई म्हणाले की, वस्तुस्थिती दर्शवते की, महिला आणि आरोपीमध्ये तीन वर्षांपासून शारीरिक संबंध होते आणि दोघांचे प्रेमसंबंध होते. न्यायमूर्ती म्हणाले की, महिलेच्या जबाबावरून तिची कोणत्याही प्रकारे फसवणूक केल्याचे सिद्ध होत नाही.

 

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा संदर्भ दिला.
न्यायालयाने म्हटले की, दोन गोष्टी सिद्ध कराव्या लागतील, पहिली म्हणजे खोटी माहिती देऊन लग्नाची चर्चा झाली.
दुसरे म्हणजे, वचन चुकीचे होते आणि त्याच्या भ्रमात महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास सहमती दिली.

चुकीची माहिती देऊन शारीरिक संबंधांचा पुरावा नाही!

  • उच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणात आरोपीला महिलेशी लग्न करायचे नव्हते हे दाखवणारा कोणताही पुरावा नाही.
  • खोटी माहिती देऊन महिलेला आरोपीने शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले होते, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत.
  • त्यामुळे प्रदीर्घ नातेसंबंधानंतर लग्न करण्यास नकार दिल्याबद्दल तिला फसवणूक केल्याबद्दल दोषी ठरवता येणार नाही.

Tags: mumbaimumbai high courtPalgharपालघरमुंबईमुंबई उच्च न्यायालय
Previous Post

विधिमंडळ अधिवेशन: फडणवीसांचा आघाडीवर हल्ला, “राज्यात रोकशाही आणि रोखशाही!”

Next Post

दहावी-बारावी परीक्षांचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर

Next Post
varsha gaikwad

दहावी-बारावी परीक्षांचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!