मुक्तपीठ टीम
झटपट श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकट मार्ग अंवलबून काही तरुणींसह मॉडेल्सच्या मदतीने मुंबई शहरात चालणार्या एका हायफाय सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. मंगळवारी सायंकाळी जुहूच्या रामाडा इन पामग्रोव्ह हॉटेलमध्ये एपीआय सचिन वाझे व त्यांच्या पथकाने कारवाई करुन तिघांना अटक केली. त्यात दोन महिला तर एका पुरुष दलालांचा समावेश आहे. या तिघांविरुद्ध भादवी आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संदीप दशरथ इंगळे, तन्वी योगेंद्र शर्मा आणि हनुफा मुजाहिद सरदार ऊर्फ तानिया अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर त्यांना बुधवारी दुपारी शिवडी येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी आठ तरुणींची सुटका केली आहे. त्यात काही मॉडेल्सचा समावेश आहे. मेडीकल केल्यानंतर या सर्व तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
कारवाईत पोलिसांनी साडेपाच लाख रुपयांची कॅश, चौदा महागडे मोबाईल, कार आणि इतर साहित्य असा सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे एपीआय सचिन वाझे यांना मुंबई शहरात एक हायफाय सेक्स रॅकेट चालवित जात असून वेश्यादलाल म्हणून काम करणारे तन्वी, तानिया आणि संदीप हे विविध राज्यात तसेच मुंबई शहरात ग्राहकांना मॉडेल्स मुली वेश्याव्यवसायासाठी पुरवितात. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी या तिघांचे मोबाईल क्रमांक मिळविले. बोगस ग्राहक बनवून त्यांना संपर्क साधला, सोमवारपासून त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याकडे नऊ मॉडेल्सची मागणी करुन त्यांना मॉडेल्स तरुणींचे फोटो पाठविण्याची विनंती केली होती. त्यानंतर या तिघांना त्यांना व्हॉटअपवरुन काही मॉडेल्स तरुणींचे फोटो पाठविले होते. त्यांच्यातील सौदा पक्का होताच या मॉडेल्सला घेऊन त्यांनी जुहू येथील रामाडा इन पामग्रोव हॉटेलमध्ये बोलाविण्यात आले होते. तिथे आधीच नऊ रुम बुक करण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता ठरल्याप्रमाणे संदीप, तन्वी आणि हनुफा हे तिघेही आठ तरुणीना घेऊन हॉटेलमध्ये आले होते. यावेळी बोगस ग्राहकांनी त्यांना इशारा केला, त्यांच्यात आर्थिक व्यवहार सुरु असतानाच अचानक एपीआय सचिन वाझे व त्यांच्या पथकाने तिथे कारवाई करुन या तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेल्या तरुणींची चौकशी केल्यानंतर त्यांना तिथे वेश्याव्यवसायासाठी बोलाविण्यात आले होते. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन देण्याचे ठरले होते.
प्रत्येक तरुणींना मिळणार्या रक्कमेतून काही रक्कम संदीप, तन्वी आणि हनुफा यांना मिळणार होते. तपासात ही माहिती उघडकीस येताच या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध ३७० (३), (३४), भादवी सहकलम ४, ५, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ५९ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम, ७ लाख २५ हजार रुपयांचे १४ महागडे मोबाईल, १२ लाख रुपयांची लाल रंगाची रेनॉल्ट कंपनीची कार आणि इतर साहित्य असा २४ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना स्थानिक न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बळीत नऊ तरुणींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. त्यांची माहिती त्यांच्या पालकांना कळविण्यात आली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे, ही टोळी एस्कॉर्टच्या नावाने सेक्स रॅकेट चालवित होते. त्यांचा व्यवहार कसा चालतो, आरोपींची माहिती ज्या वेबसाईटवरुन प्राप्त झाली. ती वेबसाईट कोणी तयार केली. बळीत तरुणींशी त्यांनी कशा प्रकारे संपर्क साधले होते. या कारवाईत पोलिसांनी आठ तरुणींची सुटका केली असली तरी त्यांच्या संपर्कात इतर काही तरुणी तसेच मॉडेल्स आहेत. त्यांची जबानी घेणे बाकी आहे, तिन्ही आरोपी हायफाय सेक्स रॅकेट चालवित होते. त्यासाठी त्यांनी काही आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकाचा वापर केला होता तो कशासाठी, त्यांच्या बँक खात्याच्या तपशीलची माहिती काढणे. या टोळीने अशाच प्रकारे इतर तरुणींची फसवणुक केल्याची शक्यता आहे. या तरुणींना बॉलीवूडमध्ये सिनेमा, हिंदी मालिका, फोटो शूट, वेबसिरीज, मॉडलिंग आदीमध्ये काम देण्याचे लालच दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात होता याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे.