मुक्तपीठ टीम
मुंबई सीमाशुल्क विभागाने तब्बल २६९ किलो अंमली आणि मनोवर्ती पदार्थ नष्ट केले. या अंमली पदार्थांमध्ये १९१.६० किलो हेरॉईन , ६५.२० किलो मेफेड्रोन, १०.०२ किलो केटामाइन आणि १.८६ किलो फेनाईलप्रोपॅनोलामाइनचा समावेश आहे.
Mumbai Customs Zone 1 destroyed 269 Kg of Narcotics comprising of Heroine, Mephedrone, Ketamine & PhenylPropanolamine which were disposed by way of incineration in the presence of Drugs Disposal Committee of officers of Customs, DRI, NCB & Police .@cbic_india pic.twitter.com/KQHOXLzynr
— Mumbai Customs Zone 1 (@mumbaicus1) December 29, 2021
सीमाशुल्क,महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) आणि पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश असलेल्या अंमली पदार्थ विल्हेवाट समितीच्या उपस्थितीत या अंमली पदार्थाची जाळून विल्हेवाट लावण्यात आली.
या अधिकाऱ्यांमध्ये अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे क्षेत्रीय संचालक, सहआयुक्त आणि उपायुक्त (सीमाशुल्क),महसूल गुप्तचर विभागाचे अतिरिक्त संचालक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे.यापूर्वी हे अंमली पदार्थ महसूल गुप्तचर संचालनालयाचे मुंबई क्षेत्रीय विभागाने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जप्त केले होते.