मुक्तपीठ टीम
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे विलेपार्ल्यातील टर्मिनल-१ विमानप्रवासासाठी जवळजवळ एक वर्ष बंद होते. आता १० मार्च रोजी पुन्हा सुरू होईल. गेल्या वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा टर्मिनल १ बंद करण्यात आले होते.बुधवारी पहाटेपासून पाच एअरलाईन्सच्या प्रवासांसाठी टी-१ टर्मिनल खुले केले जाईल. यात देशभरातील २७ ठिकाणांहून मुंबईत येणाऱ्या १०० उड्डाणांचे प्रवाशी असतील.
केवळ इंडिगोच्या प्रवाशांना देशांतर्गत उड्डाणाच्यावेळी त्यांचे प्रस्थान आणि आगमनाचे टर्मिनल कोणते ते तपासावे लागेल. कारण त्यांची उड्डाणे दोन्ही टर्मिनलवरून असतील. गो एयर, स्टार एअर, एअर आशिया आणि त्रुजेट या एअरलाइन्सचे प्रवाशी टर्मिनल १ मधून जातील किंवा येतील. विस्तारा आणि स्पाइसजेट या टर्मिनल २ मधून नेहमीप्रमाणे कार्यरत असतील.
“इंडिगोची निवडक उड्डाणे, सबसेट सीरिज 6E 5500-6E 5900 सह टर्मिनल १ मधून जातील, तर उर्वरित टर्मिनल २ मधून कार्यरत राहतील.
मुंबईच्या टर्मिनल-१वर कोरोनासाठी कडक दक्षता
• टर्मिनल -१ मध्ये आठ नोंदणी डेस्क व सहा चाचणी केंद्रे असतील.
• या चाचणी केंद्रांमध्ये प्रवासी कोरोना आरटीपीसीआर चाचणी ८५० रुपयात करु शकतात.
• याचा रिपोर्ट आठ तासांत उपलब्ध होईल.
• कोणत्याही संशयित आजारी प्रवाशाला एक वेगळी खोलीदेखील असेल.
• विमानतळावर, प्रवासी आणि कर्मचार्यांसाठी कोरोना नियमांचे कडक पालन करण्याचे काम सुरू असेल.
• टर्मिनल १ मध्ये फेस मास्क आणि इतर आवश्यक साधने आवश्यक असतील.
पाहा व्हिडीओ: