मुक्तपीठ टीम
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात काही प्रतिबंध लावण्यात आले आहेत. हे प्रतिबंध २९ फेब्रुवारीपासून १९ एप्रिलपर्यंत लागू असतील. मुंबई पोलिसांनी त्यासाठी खास आदेश काढले आहेत.
विमानतळ उड्डाण क्षेत्रात कशावर प्रतिबंध ?
- पॅराग्लायडर्स
- बलून
- उंच जाणारे फटाके
- हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास
- लेसर प्रकाश (बीम) द्वारे विमानांच्या लँडींग, टेक ऑफ तसेच उड्डाणमार्गामध्ये अडथळा आणण्यास
कालावधी
हे प्रतिबंध करण्याचे आदेश २९ फेब्रुवारी २०२१ ते १९ एप्रिल २०२१ पर्यंतच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ नुसार मुंबई पोलिसांनी जारी केले आहेत.
धोका टाळण्यासाठी आवाहन
विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात अशा प्रकारच्या वस्तू तसेच लेसर प्रकाश सोडण्याचा प्रकार करुन विमान जमिनीवर उतरण्यास (लँडींग), विमानाच्या उ्डडाणात (फ्लाईट), उड्डाणकार्यात जाणीवपूर्वक अडचण आणण्याची घटना लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. विमान उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी हे आदेश जारी केले आहेत.