मुक्तपीठ टीम
मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढली आहे. मुंबईतल्या पाच विभागांमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. मुंबईच्या पाच विभागात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात कोरोना प्रकरणात ५०% टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
मुंबईच्या ‘ए’ विभागात कोरोनाची सर्वाधिक वाढ झाली आहे.
मुंबईतील कोरोनाचे सुपर हॉटस्पॉट
१-सर्वाधिक नोंद ९१% ए विभागामधून झाली आहे. त्यामध्ये कुलाबा, कफ परेड आणि चर्चगेटचा भाग येतो.
२-आर-उत्तर (दहिसर आणि बोरिवली) ६२%
३-ई (भायखळा आणि मुंबई मध्य) ५८%,
४- एफ-दक्षिण (परळ आणि शिवडी) ५२%
५- एम- पूर्व (गोवंडी) ५१%
या विभागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हे पाचही विभाग कोरोनाचे सुपर हॉटस्पॉट ठरताना दिसत आहेत.
प्रभागातील पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बरीच प्रकरणे नौदल परिसर आणि नरिमन पॉईंटमधून नोंदली गेली आहेत. “नरिमन पॉईंट येथील व्यावसायिक इमारतीत सुरुवातीला दोन जणांनी कोरोना चाचणी घेतली. नंतर अधिक चाचण्या घेतल्यानंतर त्यांची संख्या २२ वर पोचली. त्यानंतर इमारतीतील कँटिन बंद करून निर्जंतुकीकरण केले गेले.
कोरोना रोखणे आपल्या हाती…
प्रत्येकाने मास्क वापरावाच.
वारंवार सॅनिटायझरचा वापर करावा.
हँडवॉश किंवा साबणाने हात धुवावे.
लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तपासणी करावी.
विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वांनी अनावश्यक प्रवास टाळावा.
गर्दीच्या ठिकाणी, कार्यक्रमांना जाणे टाळणे आवश्यक आहे.
गृहनिर्माण संस्थांनीही कडक धोरण राबवणे आवश्यक आहे. रहिवाशांनी घरातून बाहेर निघताना लिफ्टपूर्वीच मास्क घातलाच पाहिजे.
मुंबई मनपाने सामुदायिक शौचालये वारंवार स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे.