मुक्तपीठ टीम
पनवेलहून गोरेगावपर्यंत जाणारी पहिली फेरी आणि तेथे काही वेळ थांबून गोरेगावहून पनवेलला परतणा-या पहिल्यावहिल्या लोकलचे सारथ्य करण्याचा बहुमान, ८ महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवेत रुजू झालेल्या मुलचंद सी. मीना यांना बुधवारी मिळाला. ‘गाडी वही थी, लेकीन फासला (अंतर) कुछ बढ गया है, ’ असे त्यांनी प्रांजळपणे ‘मुक्तपीठ’ प्रतिनिधीला सांगितले.
‘रेल्वेच्या इंजिनांवर चालकाचे काम करण्याचा मला यापूर्वीही चांगला अनुभव आहे. ‘ ४ मे २०२१ रोजी मी मध्य रेल्वेच्या लोकल सेवेत दाखल झालो आहे. त्यामुळे मला ही ड्युटी नेहमीचीच आहे. अंधेरी, गोरेगावला जाण्यासाठी वडाळयाहून रेल्वे मार्ग बदलतो. हे तर आमचे दररोजचे काम आहे. मात्र अशावेळी अत्यंत सावधपणे, छोटीशीही चुक न करता , ‘ट्रॅक’ बदलावा लागतो. याआधी अंधेरीपर्यंत लोकल घेऊन जात असे आणि परत पनवेलला येत असे. आजपासून आणखी काही जास्त किलोमीटर्स लोकल घेऊन जावी लागेल, इतकेच’ ! पनवेल ते अंधेरीपर्यंतचे अंतर सुमारे २१ किलोमीटर इतके आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
‘गेल्या काही महिन्यांपासून मी हार्बर लोकल पनवेल ते अंधेरीपर्यंत घेऊन जात होतो आणि गाडी पुन्हा पनवेलला आणण्याकरीता ‘कॅब’मध्ये जाण्यासाठी माझी दिशा बदलत होतो. पनवेल ते गोरेगावपर्यंतचे अंतर एकूण २६ किलोमीटर आहे. म्हणजे, अंधेरीहून गोरेगावपर्यंत पोहचण्यासाठी ५ किलोमीटर जास्त अंतर कापावे लागते. मात्र, हा ५ किलोमीटरचा पल्ला पार करण्यासाठी महत्वाच्या २ सावधान सुचनांचे (कॉशन आॅर्डर्स) कसोशीने पालन करावे लागते. त्यामुळे लोकल ताशी ४० ते ५० किमी या वेगाने चालवण्याचे बंधनही मोटरमनना दिले आहे. त्याचे तंतोतंत पालन न केल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागते, अशी माहिती एका ज्येष्ठ मोटरमनने दिली.
पनवेलहून गोरेगावला जाणारी पहिली लोकल चालवण्याची संधी मला माझ्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हे ही वाचा:
हार्बर मार्गावरील लोकल प्रवास ‘ थंडा थंडा…कुल कुल ’, प्रवाशांची स्वप्नपूर्ती
हार्बर मार्गावरील लोकल प्रवास ‘ थंडा थंडा…कुल कुल ’, प्रवाशांची स्वप्नपूर्ती