मुक्तपीठ टीम
गेले काही दिवस राज्यसभेतील खासदार निवडणूक , नंतरची विधानपरिषद निवडणूक ही महाराष्ट्रातील पूर्णपणे खुर्चीभोवती च्या राजकारणाचे रूप म्हणून जनता पहात असताना काल रात्रीपासून महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरणारा पुढचा प्रयोग बघण्यास मिळाला आहे. दिवसभर ज्या घडामोडी घडत आहेत त्या मध्ये भाजप आणि शिवसेनेमधील काही नेते एकत्र येवून सत्ता काबीज करणार का या तर्काभोवती सर्व चर्चा चालू आहेत. या पूर्वी राष्ट्रवादी आणि भाजप यांचा पहाटेचा शपथविधी महाराष्ट्रातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीनंतर पाहिला आहे. तेव्हा मतदारांपुढे पर्याय म्हणून आलेले विरोधी पक्ष अनैसर्गिकपणे एकत्र येत हा शपथविधी झाला होता. तय वेळेसही मतदारांना ही प्रतारणा वाटली होती . त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना कांग्रेस सह एकत्र येत महाविकास आघाडी सरकार राबवत होते.
राष्ट्रवादी , भाजपा , शिवसेना , कॉंग्रेस आणि मनसे कुणाही सोबत सत्ता स्थापन करू शकतात इतकी आता या प्रस्थापित पक्षांची राजकीय नितीमत्ता ढासळली आहे. आज त्याचा पुढचा टप्पा या पक्षांनी गाठला आहे . एकीकडे युवक देशभर रोजगाराच्या प्रश्नावर , अग्निपथ योजनेवर अत्यंत तीव्र आंदोलन करीत आहेत. महागाई ने टोक गाठले आहे. सामान्य मानून कोलमडून पडला आहे. छोटे व्यावसायिक कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणीतून उभे राहू शकलेले नाहीत. अश्या प्रश्नांनी जनतेला घेरलेले असताना हे पर्स्थापित राजकीय पक्ष केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी खेळ खेळत आहेत. या मागे मोठ्या आर्थिक घडमोडी सुद्धा होत असणार . हे सर्व जनतेशी विश्वासघाताचे रूप म्हणून पहायला मिळत आहे. आजच्या महाराष्ट्रातील घडामोडी मध्ये मतदार हा घटक पूर्णपणे कोपर्यात फेकला गेला आहे . या घडामोडी म्हणजे सत्ता काबीज करण्याची आकडेमोड असून राजकीय नितीमत्तेची प्रचंड घसरण आणि मतदारांशी विश्वासघाताचे गलिच्छ रूप आहे असेच आम आदमी पार्टी मानते .
मुकुंद किर्दत , राज्य प्रवक्ता , आप