मुक्तपीठ टीम
ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी देशाचे अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारची ही ऑफर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी नाकारली आहे. आपल्या नकारामागे कोणतेही विशेष कारण नसल्याचेही रोहतगी यांनी स्पष्ट केले आहे. याआधी रोहतगी यांनी जून २०१७ मध्ये अॅटर्नी जनरल पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर केके वेणुगोपाल यांच्यावर या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
आपल्या नकारामागे कोणतेही विशेष कारण नाही!!
- मुकुल रोहतगी सांगितले की, त्यांच्या या निर्णयामागे कोणतेही विशेष कारण नाही.
- केंद्राने या महिन्याच्या सुरुवातीला रोहतगी यांना विद्यमान अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांची जागा घेण्याची ऑफर दिली होती.
- वेणुगोपाल यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबरला संपणार आहे.
रोहतगी २०१४ ते २०१७ पर्यंत अॅटर्नी जनरल!!!
- ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी जून २०१४ ते जून २०१७ पर्यंत अॅटर्नी जनरल होते.
- त्यांच्यानंतर जुलै २०१७ मध्ये वेणुगोपाल यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
- २९ जून रोजी त्यांची पुन्हा तीन महिन्यांसाठी देशातील या सर्वोच्च कायदा अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली.
- केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वेणुगोपाल यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपली अनिच्छा व्यक्त केली होती, परंतु ३० सप्टेंबरपर्यंत या पदावर कायम राहण्याची सरकारची विनंती मान्य केली होती.
अॅटर्नी जनरलचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो…
- भारत सरकारमध्ये अॅटर्नी जनरल हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
- सामान्यत: अॅटर्नी जनरलचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो.
- अॅटर्नी जनरलची नियुक्ती भारत सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतात.
- भारत सरकारच्या मुख्य कायदेशीर सल्लागाराची भूमिका अॅटर्नी जनरल बजावतात.