मुक्तपीठ टीम
www.muktpeeth.com मुक्तपीठ या मुक्त माध्यमाच्या यूट्युब चॅनलला मराठी प्रेक्षकांचं वाढतं प्रेम मिळत आहे. अगदी छोटं कुटुंब असलेल्या टीम मुक्तपीठच्या यूट्युब चॅनलला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळातील वास्तवदर्शी मांडणीचा फायदा होत आहे. या सत्तासंघर्षातील घडामोडींवर सरळस्पष्ट चर्चा आणि राजकीय नेत्यांच्या लाइव्ह कव्हरेजला चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे सध्या मुक्तपीठ यूट्युब चॅनलवरील व्ह्यूजची संख्या ही १२ लाखांवर गेली आहे. तसेच गेल्या २ महिन्यात सबस्क्रायबर संख्याही दहा हजारांवर गेली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात अनेक मुद्द्यांबद्दल मराठी माणसांच्या मनात राजकीय नेत्यांच्या उलट-सुलट भूमिकांमुळे संभ्रमाची स्थिती होती. नेमकं खरं काय आणि खोटं काय याविषयी माध्यमांमधील कव्हरेजमधून योग्य मांडणी होत नसतानाच मुक्तपीठनं त्याविषयाचा सरळस्पष्ट वेध घेतला. भारताच्या संविधानाच्या परिशिष्ट दहामधील पक्षांतरबंदी तरतुदींची माहिती, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा सोप्या भाषेतील विश्लेषण आणि शिवसेनेचं संविधान काय सांगतं, हे आणि असे सारे मुद्दे मराठी माणसांना भावले. प्रतिसाद वाढू लागला.
आता श्री गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात मुक्तपीठच्या यूट्युब चॅनलवरील व्ह्यूजची संख्या १२ लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. तर त्याचवेळी सबस्क्रायबरची संख्या गेल्या दोन महिन्यांमध्ये दहा हजाराच्या पुढे गेली आहे. हा वाढता प्रतिसाद मराठी प्रेक्षकांचा कौल राजकीय, वैचारिक जोखड न जुमानता केलेल्या स्वतंत्र पत्रकारितेला असल्याचं दाखवत आहे.
मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संस्थापक तुळशीदास भोईटे हे आहेत. ते नुकतेच मुक्तपीठची जबाबदारी टीमकडे सोपवून इतर उपक्रमाकडे वळले आहेत. त्यांच्यासोबत तयार झालेली तरुण पत्रकारांची टीम आता मुक्तपीठची जबाबदारी सांभाळत आहे.
आपण अद्याप मुक्तपीठचं यूट्युब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल, तर कृपया नक्की करा. बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशनही मिळवा. फेसबुक पेजही लाइक करा. इंस्टाग्राम, ट्विटर, कू, शेअरचॅट येथेही मुक्तपीठ या नावानेच टीम सक्रिय आहे. तेथेही सोबत राहा. आपल्याला लेखातून अभिव्यक्त व्हायचं असेल, व्हिडीओतून काही मांडायचं असेल, तर कृपया मु्क्तपीठच्या 70211 48070 या क्रमांकावर संपर्क साधा. त्याच क्रमांकावर व्हॉट्सअॅप, टेलिग्राम करा.
ईमेल muktpeethteam@gmail.com या आयडीवर करू शकता.