मुक्तपीठची ‘आरोग्य अव्यवस्थेचा पंचनामा’ मालिका विधानसभेतही गाजली आहे. भाजपा – शिवसंग्रामच्या आमदार भारती लव्हेकर यांनी आरोग्य अव्यवस्थेमुळे महिलांना होणाऱ्या जीवघेण्या त्रासाकडे सरकारचे लक्ष वेधले. पुढे जावू द्या…पुढे जावू द्या…करत स्थानिक आरोग्य केंद्र ते ग्रामीण रुग्णालय ते असलंच तर जिल्हा नाहीतर थेट मुंबईतील रुग्णालय…असं करता करता गरोदर महिला, तिच्या पोटातील बाळही स्मशानात पोहचतात. स्थानिकांची ही व्यथा आमदार लव्हेकरांनी कळवळून मांडली. त्यांच्या जोडीने आमदार अमीत साटम यांनी रुग्णवाहिका समस्या मांडत त्याचा त्रास सांगितला.