मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मुख्तार अब्बास नकवी आणि रामचंद्र प्रसाद सिंग यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. दोघांचेही राज्यसभा कालावधी आज संपला आहे. याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी देश आणि जनतेची सेवा केल्याबद्दल दोन्ही नेत्यांचे कौतुक केले होते. विशेषतः नकवी यांच्या कामाबद्दल कौतुक केल्याने नक्वी यांना भाजपा उपराष्ट्पतीपदी संधी देणार असल्याची जोरदार चर्चा पुन्हा सुरू झाली
पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांचे कौतुक केले!
- मोदी सरकारच्या दोन कॅबिनेट मंत्री आपापल्या पदाच्या राजीनामा देतील, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.
- बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी मुख्तार अब्बास नकवी आणि आरपीपी सिंह यांची भरभरून प्रशंसा केली.
- दोन्ही नेत्यांचा राज्यसभा सदस्य म्हणून कार्यकाळ ७ जुलैला म्हणजेच गुरुवारी संपला आहे.
आरसीपी सिंग जेडीयूच्या कोट्यातून केंद्रीय मंत्री!
- आरसीपी सिंग हे जनता दल युनायटेड (जेडीयू) च्या कोट्यातून केंद्र सरकारमध्ये मंत्री होते.
- त्यांनाही जेडीयूने पुढील कार्यकाळ दिलेला नाही.
- त्याचं कारण आरसीपी यांची भाजपाशी वाढलेली जवळिक आणि नितीश कुमारांच्या नियंत्रणाबाहेर जाण्याचा प्रयत्न, असं सांगितलं जातं.
- ते नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडवर नियंत्रण वाढवण्याच्या प्रयत्नात असल्यानेच त्यांना पुन्हा खासदारकी देण्यात आली नाही.
- थोडक्यात त्यांना बिहारचे एकनाथ शिंदे बनण्याचा प्रयत्न करणे भोवले.
नक्वी यांना उपराष्ट्रपती किंवा राज्यपाल करण्याची शक्यता!
- नकवी यांनीमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांचीही आज भेट घेऊन त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली.
- नकवी यांना भाजप उपराष्ट्पतीपदी संधी देणार असल्याची जोरदार चर्चा पुन्हा सुरू झाली.
- ऑगस्टमध्ये उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
- नक्वीनकवीयांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार न केल्यास त्यांना राज्याचे राज्यपाल किंवा केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल बनवले जाऊ शकते.