मुक्तपीठ टीम
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) केलेल्या तपासात आतापर्यंत धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. स्फोटके ठेवण्याचा कट पोलीस मुख्यालय आणि सचिन वाझे यांच्या ठाणे येथील घरात रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस मुख्यालयात स्फोटके ठेवलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचेही येणे-जाणे होते. येथून एनआयएला एक सीसीटीव्ही रेकॉर्डिंगही मिळाले आहे, त्यात वाझे आणि मनसुख एकाच कारमध्ये बसलेले दिसत आहेत.
कटामागे सचिन वाझेच?
• सचिन वाझे यांनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवण्याचा कट रचल्याचा पुरावा एनआयएला मिळाला आहे.
• २५ फेब्रुवारी रोजी रात्री गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर उभी केली होती.
• त्यात जिलेटीनच्या २० कांड्या आढळल्या होत्या.
• सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या स्कॉर्पिओमागील इनोव्हा कार गुन्हे अन्वेषण पथकाची (सीआययू) होती.
• ती सीआययूच्या पोलिसांकडून चालविली जात होती.
• एनआयएच्या तपासातून हे स्पष्ट झाले आहे की, वाझेच स्कॉर्पिओ चालवत होते,
• त्यानंतर ते इनोव्हामध्ये बसून निघून गेले.
एनआयए अधिकारी आयुक्तांना भेटले
एनआयएचे महानिरीक्षक अनिल शुक्ला यांनी मुंबई पोलीस आयुक्त
यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी पोलीस सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे आणि पोलीस उपायुक्त एस. चैतन्य हेही त्यांच्यासोबत उपस्थित होते.