मुक्तपीठ टीम
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एका दिवसात ३३,३०१ कोटी रुपयांनी वाढ झाली. रिलायन्सच्या शेअर्स मूल्यात सुमारे ६ टक्के वाढ झाली. यामुळे मुकेश अंबानींच्या संपत्तीत वाढ झाली. या वाढीनंतर अंबानींची एकूण संपत्ती ८१.७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. फोर्ब्स रियल टाइम अब्जाधीशांच्या ताज्या यादीनुसार, जगातील श्रीमंतांच्या यादीत ते १२ व्या स्थानी आहेत. तसेच आशिया खंडात ते प्रथम स्थानावर आहे. ७१.६ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले चीनचे झोंग शानशान आशिया खंडातील दुसऱ्या आणि जगात १४ व्या स्थानावर आहे.
मुकेश अंबानींच्या रिलायन्सच्या शेअर्स मूल्यात वाढ
• रिलायन्सच्या शेअर्समध्ये जवळपास ६ टक्के वाढ झाली.
• एनएसईमध्ये ५.९९ टक्क्यांनी वाढून २,०९५.९५ वर पोहचले.
• बीएसईवर ५.९० टक्क्यांनी वाढ झाली.
• १६ सप्टेंबर २०२० रोजी रिलायन्सचे शेअर २३६९ रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहचले आहे.
• तेव्हा रिलायन्सची मार्केट कॅप १६ लाख कोटींच्या पुढे गेली होती.
• यासह अंबानी यांची संपत्ती ९० अब्ज डॉलर्सवर पोहचली आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावर पोहोचले, पण त्यानंतर शेअर्सचे मूल्य पहिल्या दहामध्ये घसरले.
• दरम्यान, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे १७ व्या स्थानावर आहेत.
• शुक्रवारी अदानी समूहाच्या ६ पैकी ४ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली.
• यामुळे गौतम अदानींचे नेटवर्थ कमी झाले.
• ६६.५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंत यादीत ते १७ व्या आणि आशियात तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
अमेरिकन जेफ बेजोसऐवजी आता फ्रेंच बर्नार्ड अर्नाल्ट नंबर १ कुबेर!
• फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, अॅमेझॉनच्या जेफ बेझोसला मागे टाकत फ्रान्सचा बर्नार्ड अर्नाल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. त्यांची एकूण संपत्ती १९२.४ अब्ज डॉलर्स आहे.
• दुसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस असून त्यांची संपत्ती १८७ अब्ज डॉलर्स आहे.
• जगातील सर्वात जास्त मूल्यवान वाहन कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलन मस्क यांची संपत्ती १५६ अब्ज डॉलर्स आहे. ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
• चौथ्या क्रमांकावर बिल गेट्स आहेत.