मुक्तपीठ टीम
भारताच्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड २०२२चा किताब आपल्या नावावर करत मोठा विजय मिळवला आहे. तिने मिळवलेला विजय हा देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. सरगम कौशल ही जम्मू-काश्मीरची मूळ रहिवासी असून ती शिक्षिका आणि मॉडेल आहे. जम्मूच्या बाहू फोर्ट येथील सरगमच्या घरी अभिनंदन करणाऱ्यांची झुंबड उडाली आहे. सरगमने ६३ देशांतील महिलांना मागे टाकत हे विजेतेपद पटकावले आहे.
यावेळी मिसेस पॉलिनेशियाला ‘फर्स्ट रनर अप’ आणि मिसेस कॅनडाला ‘सेकंड रनर अप’ म्हणून घोषित करण्यात आले. मिसेस इंडिया पेजेंटने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर विजेत्याची घोषणा केली आहे.
सरगम कौशल ही एक ‘शिक्षिका’ आहे!
- सरगम कौशल व्यवसायाने शिक्षक आहे.
- सरगमचे वडिल जीएस कौशल, बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक आहेत.
- वडिल म्हणाले की, सरगमच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे. सरगमला शिक्षण क्षेत्रात विशेष रस आहे.
- शिक्षकांचा जुना आदर परत यावा, अशी तिची इच्छा आहे.
कार्यक्रमानंतर एका व्हिडिओमध्ये सरगम म्हणाली की, ‘आम्हाला २१-२२ वर्षांनंतर ताज परत मिळाला आहे. मी खूप उत्सुक आहे. भारतावर प्रेम करा, जगावर प्रेम करा. आदिती गोवित्रीकरने २००१ मध्ये शेवटचे विजेतेपद पटकावले होते.’
सरगम कौशच्या वैयक्तिक जीवनाबाबत माहिती
- सरगम कौशलचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर तिने ब्यूटी पेजेंट जिंकण्याचा निर्धार केला होता.
- यानंतर ती मुंबईत आली आणि मॉडेलिंगला सुरुवात केली आणि अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. मिसेस इंडियामध्येही ती सहभागी झाली होती.
- सरगम कौशल ३२ वर्षांची आहे आणि तिने अंतिम फेरीसाठी भावना राव यांनी डिझाइन केलेला चमकदार गुलाबी स्लिट गाऊन परिधान केला होता.
- सरगमने इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
- सरगम कौशलचे पती नौदलाचे अधिकारी असून त्याची ड्युटी मुंबईत आहे.
- ती आता अमेरिकेत आहे.