सचिन मतकर / व्हा अभिव्यक्त!
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा संयम सुटत चालला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे नैराश्येतून विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलून आपले आयुष्य संपवू लागले आहेत. परंतु सरकार अतिशय निष्क्रिय वागत आहे, सरकारने आता तरी जागे होऊन येत्या आठ दिवसात महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन खालील गोष्टींची तातडीने कार्यवाही करावी. आज माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात आलीच पाहिजे. एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली आहे. याआधीही अशा घोषणा झाल्या. आता प्रत्यक्षात कृती व्हावी. प्रत्यक्ष कृती म्हणजे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या पुढील मागण्यांची पूर्तता:
१) गेल्या तीन वर्षात ज्या ज्या परीक्षा झाल्या आहेत, ज्यांची फक्त नियुक्ती बाकी आहे या सर्व विद्यार्थ्यांना येत्या पंधरा दिवसात नियुक्ती द्यावी.
२) ज्या परीक्षेच्या प्रक्रिया अंतिम टप्यात आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत यामध्ये पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचाणी, अभियांत्रिकी मुलाखत व अन्य परीक्षा संदर्भात लवकर कार्यवाही करावी.
३) PSI/STI/ASO संयुक्त गट ब परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्या
४) महापोर्टल मार्फत ज्या परीक्षेचे फॉम भरून घेण्यात आले होते उदा .पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती व अन्य परीक्षा लवकर घेण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी.
४ ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्य पदे तातडीने भरावीत
५) राज्य सेवेचा पूर्वपरीक्षेचा पेपर 2 Csat क्वालिफाय करावा.
६) २०२१ मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांच्या जहिराती त्वरित काढाव्या.
७) राज्य सरकारच्या गट क व गट डच्या सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्या
८) सर्व नोकर भरती ही नेहमीप्रमाणे @ऑफलाईन परीक्षांमार्फत व्हावी (विद्यार्थ्यांना online exam वर विश्वास नाही, भ्रष्टाचार होतो)
हेही वाचा: “मंत्र्याच्या, अधिकाऱ्याच्या पोरानं आत्महत्या केली की कळेल गरीबाचं पोरगं मेल्यावरच्या वेदना!”
गेली दोन वर्षे राज्य सरकारने नोकर भरतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे पोलीस शिपायांपासून उपजिल्हाधिकारी पदाची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा सरकारच्या नाकर्तेपणामुळे होत आहे. गेली चार वर्ष पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांच्या हाडाची काडे झाली परंतु या स्वार्थी राजकारण्यांनी याकडे दुर्लक्ष केले. गेले तीन वर्षे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये दोन सदस्य आहेत. त्या सदस्याची नियुक्ती करण्यासाठी सरकारने हालचाल केली नाही. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे .
संयुक्त पुर्व परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती आता कोरोना नियंत्रणात आलेला आहे मग परीक्षा घेण्यास अडचण काय? आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य व एमपीएससीने तातडीने सर्व परीक्षांसंदर्भात तारखा जाहीर कराव्यात आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हीच राज्य सरकारकडून माफक अपेक्षा.
शेवटी एकच सांगतो सर्व विद्यार्थ्यांना परिस्थिती वाईट आहे परंतु असे टोकाचं पाऊल स्वप्निलने घ्यायला नको हवं होतं, किमान आपल्या आई वडिलांचातरी विचार करायला पाहिजे होता. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सक्षम व्हावे परिस्थिती सुधारण्यासाठी आपण नेहमी स्वतः मध्ये बदल घडवा आणि आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आयुष्य लढायला शिका. त्यांच्या कृतीतून त्यांच्या शौर्याकडे बघून काही तरी बोध घ्यावा, त्यामुळे स्वतःला मजबूत संयमी ठेवता येईल.
आयुष्य जगायला खूप पर्याय आहेत मित्रांनो.
आपल्याला काही प्रोब्लेम असेल तर ते आपल्या मनात ठेऊ नका ते आपल्या आई, वडील,भाऊ ,बहिण,मित्र मैत्रिणी शिक्षक यांच्यापैकी कोणाकडेही बोलत रहा. हे पण दिवस जातील आयुष्य खरचं खुप सुंदर आहे. संयम ठेवा सर्व व्यवस्थित होणार.
भावपूर्ण श्रद्धांजली स्वप्नील लोणकर
मी एक तुमच्यातला स्पर्धा परीक्षा करणारा (MPSC विद्यार्थी) सचिन मतकर जालना.