मुक्तपीठ टीम
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर आता पुन्हा एकदा एमपीएससी कडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. १४ मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं परीक्षा पुढे ढकलल्या असल्याचे आयोगाने जाहीर केले. पण ऐनवेळी जाहीर करण्यात आल्यानं विद्यार्थी संतापले आहेत.
येत्या १४ मार्च रोजी एमपीएससीची मार्च २०२० मध्ये होणारी पूर्वपरीक्षा होणार होती. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन दिली आहे.
परीक्षेच्या अवघ्या ३ दिवसांआधी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आता उमेदवारांकडून याविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, विद्यार्थ्यांनी पोलिसांचं ऐकलं नाही. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
#MPSC परीक्षा पुढे ढकलण हा लाखो मुलांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. परिणामी मोठा सामाजिक प्रश्न निर्माण केला जातोय. याची जबाबदारी सरकार घेणार आहे का? #म #mpscexam #Pune@PawarSpeaks @OfficeofUT @AjitPawarSpeaks @supriya_sule pic.twitter.com/DJHCi5EzPM
— Shital Pawar (@iShitalPawar) March 11, 2021
याआधीही मराठा आरक्षण स्थगितीमुळे परीक्षा पुढे ढकलेल्या-
- मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती.
- त्यानंतर ठाकरे सरकारनं एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
- त्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.
- एमपीएससीच्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यांनतर आता आज परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
- कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे राज्यात प्रतिष्ठेचं वलय असणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या होत्या.
- अनेक वर्षांपासून तयारी करत असलेले विद्यार्थी या परीक्षांची वाट पाहत होते.
- अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षादेखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जात होती.
महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थी MPSC परीक्षेची वाट पहात होते परंतु कोरोनाचे गोजिरवाणे कारण देऊन परिक्षा अचानक पुढे ढकलली,कोरोना ची पुरेपूर काळजी घेऊनही परीक्षा घ्यायला हरकत नव्हती.पण सरकारने विद्यार्थ्यांचं वाटोळंच करायचं ठरवलंय मग पर्याय कसा सुचेल?@OfficeofUT @Dev_Fadnavis pic.twitter.com/ZIPS3VoRmt
— Ram Satpute (@RamVSatpute) March 11, 2021
तुम्हाला काय उद्या नाही झाले आमदार, तरी पेन्शन सुरू राहील. मुख्यमंत्रीने स्वतच्या पोराला आमदार बनवून त्याचे भविष्य सुखी केले. मग आम्ही कुठे जायचे? लॉकडाऊन मध्ये धंदा बसला म्हणून बापाने रिक्षा विकली. MPSC वर खूप आशा होती, पण आता डोक्यात आत्महत्यचे विचार येत आहेत. चुलीत जाओ सरकार
— Kaushik (@KaushikK2792) March 11, 2021
सोशल मीडियावर आघाडी सरकारविरोधात संताप
दरम्यान, सोशल मीडियावरही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनाचं कारण देताय पण मग बाकीच्या परीक्षांना कोरोना शिवत कसा नाही??
परीक्षा वेळेवर झाल्याच पाहिजेत.. देशाच्या भवितव्याला आव्हान देताय तुम्ही हे लक्षात असु द्या..#mpsc @CMOMaharashtra @RRPSpeaks— Sonal B (@I_am_Bsonal) March 11, 2021
ऐनवेळी निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना अडचणीत टाकले!
कोरोनामुळे परिस्थिती बिघडली असली तरी ऐनवेळी परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना अडचणीत टाकलं गेलं आहे. त्यामुळे सरकारने याचा पुनर्विचार करावा, असे मत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले आहे.
My quote on postponing MPSC exams. pic.twitter.com/cizLXGdP8r
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 11, 2021
#एल्गार #एमपीएससी #हक्काची_लढाई #mpsc #mpscexam #mpscexampostpond pic.twitter.com/GWCdSCovlg
— prathmesh (@joshiiprathmesh) March 11, 2021