मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्यात मविआ सरकार आल्यापासून राज्य शासनाने उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार या पदांच्या जागा काढल्या नाहीत. राज्य शासनाकडून UPSC प्रमाणे दरवर्षी उपजिल्हाधिकारी, DySP, तहसीलदार सह इतर 32 संवर्गाचे मागणीपत्रक जाणे अपेक्षित असताना राज्यसेवा 2022 साठी शासनाने 8 संवर्गाचे फक्त 161 जागांचे मागणीपत्रक पाठवले आहे. यामुळे 4 लाखांहून अधिक उमेदवार नाराज आहेत.
रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून ट्विटरच्या माध्यमातून चला महसूलला जागे करुया या हॅशटॅग ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नुकतेच अनिल गलगली यांनी माहिती उघडकीस आणली होती की एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हापरिषद यात मंजूर पदांची संख्या 10,70,840 इतकी आहे. ज्यापैकी 8,26,435 ही पदे भरलेली आहेत. तर 2,44,405 ही पदे रिक्त आहेत. यात शासकीय कर्मचाऱ्यांची 192425 तर जिल्हापरिषदेच्या 51980 अशी एकूण 244405 पदे रिक्त आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी लाखों उमेदवारांच्या समर्थनात ट्विट केले आणि राज्य शासनाला मागण्या पूर्ण करण्यासाठी विनंती केली आहे.
MPSC ने 2021 पासून परीक्षा देण्याच्या प्रयत्नाला प्रतिबंध केले आहे. त्यामुळे शासनाकडून UPSC प्रमाणे दरवर्षी उपजिल्हाधिकारी, DySP, तहसीलदार सह इतर 32 संवर्गाचे मागणीपत्रक जाणे अपेक्षित असताना राज्यसेवा 2022 साठी शासनाने 8 संवर्गाचे फक्त 161 जागांचे मागणीपत्रक पाठवले आहे.
मागील 3 वर्षे उपजिल्हाधिकारी व तहसीलदार जागांचे मागणीपत्रक न आल्याने राज्यात पहिला येऊन देखील प्रशासनातील सर्वोच्च पद न मिळाल्याने उमेदवारास परत परीक्षा द्यावी लागत आहे. उदा. राज्यसेवा 2020 मध्ये प्रमोद चौगुले राज्यात पहिले येऊन देखील त्यांना परत 2021 ची परीक्षा द्यावी लागत आहे. यात उमेदवारांचे फक्त वर्ष आणि प्रयत्न वाया जात आहेत. MPSC उमेदवार गेले कित्येक दिवस विविध माध्यमातून सर्वसमावेशक मागणीपत्रकासाठी व जागा वाढीसाठी मागणी करत असताना शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात येत नाही आहे.
अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांस विनंती केली आहे की लवकरात लवकर मागण्याची दखल घेऊन सर्व विभागांना 32 संवर्गाचे सर्वसमावेशक मागणीपत्रक देण्याबाबत निर्देश द्यावेत.
Sunil Jadhav
#चला_महसूलला_जाग_आणुया रिक्त जागा MPSC आयोगाकडे कधी पोहोचणार? 3 वर्षांपासून DC,Dysp तसेच तहसीलदार यांच्या शून्य (0) जागा काढल्या आहेत..महसूल विभागाने लक्ष द्यावे हीच विनंती
#चला_महसूलला_जाग_आणुया रिक्त जागा MPSC आयोगाकडे कधी पोहोचणार? 3 वर्षांपासून DC,Dysp तसेच तहसीलदार यांच्या शून्य (0) जागा काढल्या आहेत..महसूल विभागाने लक्ष द्यावे हीच विनंती@bb_thorat @RRPSpeaks @bharanemamaNCP @satyajeettambe @supriya_sule @GopichandP_MLC @ChitraKWagh pic.twitter.com/olwC2kZqUn
— Sunil Jadhav (@sunilJa88330821) May 29, 2022
ANKIT RAWAT
#चला_महसूलला_जाग_आणूया #fill vaccancy
#चला_महसूलला_जाग_आणूया #fill vaccancy@CMOMaharashtra @bharanemamaNCP @AjitPawarSpeaks @NiteshNRane @parthajitpawar @Devendra_Office @GopichandP_MLC @Pankajamunde @dbmahadik @dhananjay_munde @satejp @mrhasanmushrif @bb_thorat @BalaNandgaonkar @RajThackeray @GajananKaleMNS pic.twitter.com/BxTL4gn4FG
— ANKIT RAWAT (@ANKITRA18401923) May 29, 2022
Abhishek Bhosale
एकीकडे संधींची मर्यादा घातली आणि दुसरीकडे अपुऱ्या जाहिराती, सध्या सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त आहेत, त्यांनी थोडा वेळ तरुणांच्या समस्यांसाठी द्यावा ही विनंती.
एकीकडे संधींची मर्यादा घातली आणि दुसरीकडे अपुऱ्या जाहिराती,
सध्या सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त आहेत, त्यांनी थोडा वेळ तरुणांच्या समस्यांसाठी द्यावा ही विनंती.#चला_महसूलला_जाग_आणूया@CMOMaharashtra@bharne @maharashtra_hmo@mataonline@AjitPawarSpeaks @bb_thorat pic.twitter.com/TdagLBg13E— Abhishek Bhosale (@Abhishek_9_12_B) May 29, 2022
Mpsc समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
आपण म्हणता आमच्या समोर बेरोजगारी सर्वात मोठी समस्या आहे मग आपण आपल्या विभागाच्या जागा का काढत नाहीत. लवकरात लवकर जागे व्हा आणि मागणीपत्र पाठवा.
.@bb_thorat आपण म्हणता आमच्या समोर बेरोजगारी सर्वात मोठी समस्या आहे मग आपण आपल्या विभागाच्या जागा का काढत नाहीत. लवकरात लवकर जागे व्हा आणि मागणीपत्र पाठवा.@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@satyajeettambe#चला_महसूलला_जाग_आणूया pic.twitter.com/HJqUlHqn09
— Mpsc समन्वय समिती महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) May 29, 2022
Subhash Shelke – सुभाष शेळके
महसूल विभागांतर्गत असणारी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार,उपअधीक्षक भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक गट ब पदांच्या १००% रिक्त जागांचे मागणीपत्रक तातडीने आयोगाकडे पाठवण्यात यावे. मुद्रांक निरीक्षक पदाच्या १५४ जागा रिक्त आहेत.
मागणीपत्रक द्या #चला_महसूलला_जाग_आणूया
महसूल विभागांतर्गत असणारी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार,उपअधीक्षक भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक गट ब पदांच्या १००% रिक्त जागांचे मागणीपत्रक तातडीने आयोगाकडे पाठवण्यात यावे.
मुद्रांक निरीक्षक पदाच्या १५४ जागा रिक्त आहेत.@bb_thorat मागणीपत्रक द्या#चला_महसूलला_जाग_आणूया
— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) May 29, 2022