मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षणासाठी २६फेब्रुवारीला आपण स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सांगितले. संभाजी छत्रपती यांनी मुंबईत सोमवारी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी गरज पडल्यास ओबीसी आरक्षणासाठी देखील रस्त्यावर उतरणार असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे.
आम्हाला टिकणारे आरक्षण द्या…
- याबाबत अधिक बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ”मी सर्वांना सोबत घेऊन जाणारा माणूस आहे.
- मी शाहू महाराजांचा वारस आहे.
- मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आम्हाला टिकणारे आरक्षण द्या.
- मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या.
- आरक्षण कशामुळे गेलं हे देखील सांगितले.
- परंतु त्यावर काहीच हालचाल झाली नाही.
- मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल.
- खूप दिवसांनंतर त्यावर याचिका दाखल करण्यात आली.
- सध्या त्याची काय स्थिती आहे हे काहीच माहिती नाही. माझं स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा.
संभाजी छत्रपती २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार…
- मराठा समाज देखील वंचित घटक आहे.
- २००७ पासून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे.
- त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली.
- मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही.
- ५ मे २०२१ ला आरक्षण रद्द झालं.
- त्यावेळी मला समन्वयकांनी सांगितलं की टोकाची भूमिका घेऊ नका.
- मोजून पाच ते सहा मागण्या आहेत.
- परंतु अजूनही मान्य होत नाहीत.
- मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मी अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या आहेत.
- राज्यभरातील अनेकांसोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी चर्चा केली आहे परंतु सरकार काहीच हालचाल करत नाही.
- त्यामुळे आता २६ फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या काय आहेत मागण्या?
मागणी – १
मराठा आरक्षणामुळे २०१४ ते ५ मे २०२१ पर्यंतच्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरुपी नियुक्ती द्याव्यात.
मागणी – २
ओबीसीच्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू करा.
मागणी – ३
सारथी संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरु करावीत, त्याअतंर्गत प्रत्येक जिल्ह्यात सारथी संस्थेची उपकेंद्र सुरु करुन
त्याठिकाणी शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत, संस्थेला एक हजार कोटींची तरतूद करुन तारादूत प्रकल्प तात्काळ सुरु करावा,
मागणी – ४
अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरघोस निधी मिळावा, लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल करत व्याज परताव्याची १० लाख रुपयांची मर्यादा वाढवून ती किमान २५ लाख रुपये करावी
मागणी – ५
शासनाकडून पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता दिला जातो, मुंबई, नागपूर पूणे अशा महानगरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना २ हजार रुपये प्रति महिना दिले जाता ही रक्कम वाढवावी.
शासनाकडून मागासवर्गीय वसतिगृहांच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात किमान प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरुपी वसतिगृहांची उभारणी करावी, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी सीटस निर्माण कराव्या अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे.