Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पोलिसांकडून पत्रकारांचं नग्न फोटो सेशन!

काय तर म्हणे कपड्यांनी कोठडीत आत्महत्या केली असती!

April 8, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
mp police forces journalists, theatere artists & done photo session

मुक्तपीठ टीम

मध्यप्रदेशातील काही पत्रकार आणि रंगकर्मींना पोलिसांनी नग्न करून त्यांचे फोटो सेशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आधी तर ते पत्रकार नसून काही संशयास्पद प्रवृत्तीचे लोक असल्याचा दावा केला. मात्र, नंतर ते पत्रकार असल्याचं सिद्ध झाल्यावर पोलिसांनी भलताच दावा केला. पोलिसांनी सांगितले की पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपींनी पोलीस कोठडीत आत्महत्या करू नये म्हणून आम्ही त्यांचे कपडे काढले जातात. मात्र फोटो काढून ते व्हायरल करण्याबद्दल ते काहीच सांगत नाही. पत्रकार आणि समाजातूनही संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांवर तात्पुरती कारवाई झाली आहे. कपडे काढून नग्न सेशन हे कोणत्या कायद्यात बसतं, या मुद्यावर संताप वाढतच चालला आहे.

 

पत्रकारांच्या नग्न फोटो सेशनचं प्रकरण आहे तरी काय?

  • मुळात प्रकरण सुरु झालं ते मध्यप्रदेशातील सिधी जिल्ह्यातील एक नीरजकुमार कुंदर यांच्या अटकेपासून.
  • नीरजकुमार हे इंद्रावती नाट्य समितीचे संचालक आहेत. ते विंध्याचलातील कला संवर्धनासाठी कार्यरत आहेत.
  • त्यांनी भाजपाचे स्थानिक आमदार केदारनाथ शुक्ला आणि त्यांचे पुत्र गुरुदत्त यांच्याविरोधात काही वक्तव्य केलं होतं.
  • त्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली.
  • त्यांच्या अटकेविषयी पोलीस ठाण्यासमोर काही नाट्यकर्मी आणि पत्रकारांनी निदर्शने केली.
  • त्या निदर्शनांच्यावेळी बघेली भाषेत यूट्यूबवर चॅनल चालवणारे आणि एका राष्ट्रीय न्यूज चॅनलससाठी काम करणारे कनिष्क तिवारी आणि इतर काही पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • त्यांच्यावरही तेच आरोप ठेवण्यात आले.
  • पोलिसांनी अटक केल्यानंतर पत्रकार आणि नाट्यकर्मींचे तोकड्या चड्डीशिवाय सर्व कपडे काढण्यात आले.
  • तेवढ्यावरच पोलीस थांबले नाहीत. त्यांनी तशा अवस्थेत त्या सर्वांचे फोटो काढले.
  • ते बाहेरही देण्यात आले असावेत, त्यामुळे ते सर्वत्र व्हायरल झाले.

 

पोलीस काय सांगतात?

  • सिधी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर फेक आयडीवरून वाईट कमेंट केल्या जात होत्या.
  • याप्रकरणी पोलिसांनी नीरज कुंदरला अटक केली होती. त्यावर कनिष्क यांच्यासह नाट्यकर्मी, सामाजिक कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यासमोर निषेध नोंदवला.
  • पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. कनिष्क तिवारी हा युट्युबर असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही काही तक्रारी होत्या.
  • पोलिसांच्या मते, कोतवाली पोलीस ठाण्यात कपड्यांशिवाय या सर्वांचे फोटो काढून कोणीतरी ते सोशल मीडियावर व्हायरल केले.
  • कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६२/२२ कलम ४१९, ४२०, आणि आयटी कायद्याच्या ६६सी, ६६डी अन्वये तपास सुरू आहे.
  • फोटो व्हायरल झाल्याप्रकरणी तपास डीएसपींकडे सोपवण्यात आला आहे.
  • पत्रकारच नाही तर इतर कुणीही नागरिक असलं तरी त्याच्या अटकेनंतर त्याचे कपडे काढून त्याचे नग्न फोटोसेशन करणे कोणत्याही कायद्यात बसत नाही. त्यामुळे सर्वत्र मध्यप्रदेशमधील पोलिसांचा निषेध करण्यात येत आहे.

 

पाहा:

 


Tags: Madhya Pradesh Policereportersकोतवाली पोलीस ठाणेनीरज कुंदरपत्रकारमध्यप्रदेश पोलिसरंगकर्मीं
Previous Post

राज्यात कापूस, सोयाबीन आणि गळीत धान्यांसाठी धोरण – कृषीमंत्री दादाजी भुसे

Next Post

“पोलिसांकडून पत्रकारांचं नग्न फोटो सेशन! आमदाराविरोधात बोलल्यामुळे कायद्यापुढचा जाच!”

Next Post
“पोलिसांकडून पत्रकारांचं नग्न फोटो सेशन! आमदाराविरोधात बोलल्यामुळे कायद्यापुढचा जाच!”

"पोलिसांकडून पत्रकारांचं नग्न फोटो सेशन! आमदाराविरोधात बोलल्यामुळे कायद्यापुढचा जाच!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!