मुक्तपीठ टीम
यवतमाळच्या वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडीने धाड टाकली आहे. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर खासदार भावना गवळी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपा शिवसेनेला टार्गेट करत आहे. ईडीची कोणतीही नोटीस आली नसून चौकशा सुरू झाल्या आहेत, असा गंभीर आरोप भावना गवळी यांनी केला आहे. तसेच आम्हीही आरोप केलेल्या भाजपा आमदाराच्या ५०० कोटीच्या घोटाळ्याचे काय, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
शिवसेनेच्या लोकांनाच टार्गेट केलं जातंय
- मला ईडीची कोणतीही नोटीस आलेली नाही.
- मला नोटीस मिळालेले नाही.
- त्यामुळेच हा सर्व प्रकार जुल्मी आहे.
- आणीबाणीची वागणूक दिली जात आहे.
- शिवसेनेच्या लोकांनाच टार्गेट केलं जात आहे.
- माझ्या संस्थेचा एफआयर मी स्वत: नोंदवला होता.
- मला तो हिशोब मिळाला नाही म्हणून मी तक्रार दाखल केली.
- त्यातलं एकच वाक्य पकडायचं आणि त्यातला एकच आकडा घ्यायचा आणि ट्वीट करत मोठा राईचा पर्वत बनवायचा.
- असा काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी खेळ मांडलेला आहे.
- माझ्या संस्थेची जी चौकशी होत आहे.
- तिथे ग्रामीण भागातील मुलं शिक्षण घेत आहेत.
- गेल्या २० वर्षांपासून शिक्षण घेतलं आहेत.
- विद्या देण्याचं काम त्या ठिकाणाहून होत आहे.
त्या भाजपा आमदाराचीही ईडी चौकशी लावणार का?
- मी पाचवेळा या भागातून खासदार झाली आहे.
- कदाचित काही लोकांना ते चांगलं दिसत नाही.
- आम्ही काम करतो जनतेच्या हिताचं तेही त्यांना चांगल दिसत नाही.
- माझी जी मागणी मी दहा दिवसांपूर्वी केली होती त्यामध्ये भाजपाचे एक आमदार या भागातील आहेत.
- ते भूमाफिया आहेत.
- त्यांनीही ५०० कोटींचा घोटाळा केला आहे.
- केंद्र सरकार त्यांचीही ईडी चौकशी लावणार का? हा माझा प्रश्न आहे.
- माझी जशी चौकशी सुरु आहे. तशी त्यांचीही लावा ही विनंती आहे.