मुक्तपीठ टीम
इस्त्रायललच्या दिल्लीतील दुतावासाबाहेर झालेल्या स्फोटाशी
इराणच्या मेजर जनरल कासिम सुलेमानी आणि मुख्य अणु वैज्ञानिक मोहसीन फाखरीजादेह यांच्या हत्येचा संबंध जोडला जात आहे. त्या हत्यांचा बदला घेण्यासाठी इस्त्रायल दूतावासाबाहेर स्फोटाची शक्यता वर्तलली जात आहे. इराणमधील त्या हत्यांप्रकरणी इस्त्रायली गुप्तचर संस्था मोसादविरोधात आरोप करण्यात आले होते. आता मोसादचे हेर भारतातील स्फोटाच्या चौकशीसाठी येतील अशाही बातम्या आहेत.
इस्त्रायल दुतावासाजवळ झालेस्या स्फोटाबद्दलची माहिती मिळवण्यासाठी मोसादचे हेर भारतात देखील येऊ शकतात. इस्त्रायल दुतावासाबाहेर झालेली घटना ही दहशतवादी घटना असल्याचे सांगितले जाते. इस्त्रायलशी संबंधित दहशतवादी कारवायांच्या चौकशी करण्याचे काम मोसाद करते. या निमित्ताने चर्चेत आलेल्या मोसादविषयी महत्वाची माहिती:
मोसादची स्थापना
इस्त्रायलच्या सैन्याच्या गुप्तचर विभागा अंतर्गत सुरक्षा सेवा आणि परराष्ट्र राजकारण विभाग यांच्यात समन्वय आणि सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी १३ डिसेंबर १९४९ रोजी मोसादची स्थापना केली. दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी मोसादची स्थापना केली गेली. १९५१ मध्ये मोसादला पंतप्रधान कार्यालयाचा भाग बनवण्यात आले.
जगातील पहिल्या क्रमांकाची गुप्तचर संस्था
गुप्तचर ऑपरेशन करण्यासाठी मोसेद ही जगातील पहिल्या क्रमांकाची गुप्तचर संस्था मानली जाते.
मोसाद आपले कोणतेच काम अर्धवट सोडत नाही. शत्रूला कुठूनही शोधून ते आपली मोहिम पूर्ण करतात. मोसादने बर्याच मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. भारतदेखील काही वेळा आपल्या गुप्तचर यंत्रणेला
इस्राईलच्या इंटेलिजेंस एजन्सीमार्फत प्रशिक्षण देतो.
१९८६ मध्ये गाजल्या मोसादच्या ‘किलर’ महिला हेर
इस्त्रायली गुप्तचर सेवा मोसादने ‘किलर’ महिला हेरांची ‘फोर्स’ तयार केली आहे. या महिला संशयीत व्यक्तीला त्यांच्या जाळ्यात अजकवून त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी काढून घेतात. ‘डेली मेल’ या वर्तमानपत्रात इस्राईलच्या ‘लेडी ग्लोब्स’ मधील प्रशिक्षित महिला गुप्तहेरांपैकी पाच सदस्यांच्या जीवनशैलीवर लेख लिहिण्यात आला होता. मोसाद हे गुप्तपणे कारवाया करणारे इस्रायलचे ‘किलिंग मशीन’ म्हणून ओळखले जाते. यामध्ये अर्ध्याहून अधिक महिला गुप्तहेर आहेत. .
ऑपरेशन थंडरबोल्ट
१९७६ मध्ये फ्रेंच प्रवासी विमान अरब दहशतवाद्यांनी हायजॅक केले होते. या विमानात इस्त्रायली प्रवासी होते. यावेळेस मोसादने आपली बुद्धिमत्ता आणि सामर्थ्य दाखवून आपल्या नागरिकांना हजारो किलोमीटर अंतरावर युगांडाच्या एन्टेबे विमानतळावरून सुखरूप परत आणले. हे ऑपरेशन आत्तापर्यंत संपूर्ण जगातील सर्वात यशस्वी एन्टी हायजॅक मिशन मानले जाते.
अर्जेंटिनामधील प्राणघातक मिशन
अर्जेंटिनामध्ये १९६० मध्ये मोसादने अर्जेंटिनामध्ये गुप्त मोहीम राबवली. ही मोहीम अर्जेंटिना सरकारलासुद्धा कळली नाही. मोसादने नाझी गुन्हेगार अॅडॉल्फ एकमनचे अपहरण केले अणि त्याला इस्रायलमध्ये आणले. यहुद्यांवर अत्याचार केल्याबद्दल त्याच्यावर खटला भरला गेला आणि त्याला शिक्षा देखील झाली.