Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

मध्य रेल्वेतील घाट विभागांचे मान्सून निरीक्षण, कल्याण- लोणावळा विभागातील खबरदारीचा आढावा

May 24, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Monsoon monitoring of ghat sections on Central Railway

मुक्तपीठ टीम

आगामी पावसाळ्यात उपनगरी आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या  सुरळीत आणि विनाव्यत्यय सेवा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेने मान्सूनची तयारी सुरू केली आहे.  मान्सूनचा सामना करण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांपैकी दक्षिण- पूर्वेकडील घाट विभाग म्हणजेच कर्जत- लोणावळा विभाग आणि ईशान्येकडील म्हणजे कसारा – इगतपुरी विभागात विशेष भर देण्यात येत आहे.

Ghat section GM inspection
अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी कल्याण- लोणावळा विभागाची पाहणी केली आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व खबरदारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून रेल्वे सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय धावतील.  त्यांनी घाट विभागातील मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला आणि सांगितले की, रेल्वेचा घाट विभाग अनपेक्षित दरड कोसळण्याच्या आणि लॅंडस्लाइडच्या घटनांमुळे  असुरक्षित आहे ज्यामुळे सेवा विस्कळीत होऊ शकतात.  कोणत्याही अत्यावश्यक परिस्थितीत, ही तत्परता भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन लवकरात लवकर केलेले उपाय  वाहतूक पूर्ववत करण्यास मदत करेल.

Ghat section GM inspection

अशा कोणत्याही घटना रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने दरवर्षीप्रमाणेच लॅंडस्लाइड  होण्याच्या असुरक्षित ठिकाणी एकूण १४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आखली आहे.  यापैकी ८७ सीसीटीव्ही कॅमेरे दक्षिण- पूर्व म्हणजे कर्जत – लोणावळा विभागातील १९ असुरक्षित ठिकाणी तर ५८ सीसीटीव्ही कॅमेरे ईशान्येकडील म्हणजे कसारा – इगतपुरी विभागात ११ संवेदनशील ठिकाणी  बसवण्यात येणार आहेत.  समर्पित आणि कार्यक्षम कर्मचार्‍यांच्या टीमद्वारे या सीसीटीव्हीचे २४X७ निरीक्षण केले जाईल.  हे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Ghat section CCTV.1
याशिवाय घाट विभागात ५९४  नग बोल्डरचे स्कॅनिंग आणि ड्रॉपिंगचे काम हाती घेण्यात आले असून, लवकरच हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.   जाळीच्या कामांबरोबरच लॅंडस्लाइड होऊ नये यासाठी खडकांचे अडथळे आणि टनेल पोर्टलची कामेही घाट विभागात हाती घेण्यात आली आहेत.
Ghat section. tunnel
मध्य रेल्वे नियंत्रण कार्यालय चोवीस तास कार्यरत असून  हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्षासह सतत अद्यतनांसाठी महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त कर्मचारी यांच्याशी सतत देखरेख आणि  संपर्क ठेवेल.

Monsoon monitoring of ghat sections on Central Railway


Tags: Central RailwayGhatGhat ReviewMansoon Reviewघाट विभागमध्य रेल्वेमान्सून निरीक्षण
Previous Post

मनसेकडून बृजभूषण, शरद पवार, सुप्रिया सुळेंचा एकत्र फोटो ट्वीट! पण मावळच्या कुस्ती स्पर्धेतील तो फोटो काय सांगतो?

Next Post

जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकासाच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
jejuri

जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकासाच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!