मुक्तपीठ टीम
भाजपा नेते मोहित कंबोज यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना डिवचलं आहे. त्यांनी आज ट्वीट करत “तुम्ही ३.५ भाजपा नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचं काय झालं?” असा प्रश्न विचारला आहे. तसेच त्यांनी आणखीही काही प्रश्न विचारतानाच सलीम गेला आणि जावेदही जाणार असं म्हटलं आहे. कंबोज यांनी पूर्वी नवाब मलिक म्हणजे सलीम आणि जावेद म्हणजे संजय राऊत असं म्हटलेलं.
मोहित कंबोज यांनी केलेलं ट्वीट:
प्रिय संजय राऊत,
1:3.5 लोकांचा भ्रष्टाचार बाहेर येणार – काय झाले?
2: बाप-मुलगा तुरुंगात जाणार – काय झालं?
3: EOW भाजपावाल्यांवर कारवाई करणार – काय झालं?
4 : भाजप नेत्यांच्या काळ्या कारवाया उघड करणार, – काय झालं?
राऊतांचे उक्ती मोठी आणि कृती छोटी!
मी म्हणतो, सलीम गेला, आता जावेद जाईल!
प्रिय संजय राउट ,
१:3.5 लोगों का भ्रष्टाचार बाहर आए गा- क्या हुआ ?
२:बाप बेटे जेल जाएंगे -क्या हुआ ?
३:EOW भाजपा वालों पे कारवाई करेंगी -क्या हुआ ?
४:भाजपा नेताओं के काले चिट्टे बताऊँ गा -क्या हुआ ?
राउट की बातें बड़ी और दर्शन छोटे हैं !
मैं बोलता हूँ सलीम गया अब जावेद जाएगा !— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) April 4, 2022
शिवसेना नेते संजय राऊत यांनी गाजावाजा करत एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी भाजपामधील साडेतीन नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याची घोषणा केली होती.
प्रत्यक्षात त्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या, त्यांचा मुलगा नील सोमय्यांवरील आरोपांपलीकडे त्यांची गाडी गेली नाही. मात्र, त्यांच्यावरही आजवर कारवाई झालेली नाही. त्याबद्दलही कंबोज यांनी विचारलं आहे.
मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा भाजपावाल्यांवर कारवाई करणार, भाजपा नेत्यांच्या काळ्या कारवाया उघड करणार असेही राऊत म्हणाले होते, असे सांगत कंबोज यांनी राऊत यांनी त्या सर्व इशाऱ्यांचे काय झाले असं विचारलं आहे.
संजय राऊतांची उक्ती मोठी असते, कृती मात्र प्रत्यक्षात छोटी असते, असा टोला मारत त्यांनी सलीम गेला, आता जावेदही जाणार, असा इशारा दिला आहे.