मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोरोनाची लस घेताच छायाचित्रासह ट्विट केले. त्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या आल्या. लोकल टू ग्लोबल चर्चा झाली. मात्र, त्याचवेळी त्यांच्या विरोधात टीकाही सुरु झाली. पाच राज्यातील निवडणुका लक्षात घेऊन त्यांच्या लसीकरणासाठी निवडले गेले असे म्हटले गेले. त्यांचा गमछाही निवडणूक कनेक्शन दाखवणारा ठरला. तर त्याचवेळी सामान्यांनी लसीकरणाकडे वळावे यासाठी मोदींनी लस घेतल्याचा दावा केला जात असतानाच ते ‘कॅमेराजीवी’ असल्याचीही टीका झाली.
Took my first dose of the COVID-19 vaccine at AIIMS.
Remarkable how our doctors and scientists have worked in quick time to strengthen the global fight against COVID-19.
I appeal to all those who are eligible to take the vaccine. Together, let us make India COVID-19 free! pic.twitter.com/5z5cvAoMrv
— Narendra Modi (@narendramodi) March 1, 2021
पंतप्रधान मोदींनी लसीचा पहिला डोस घेताच सुरुवातीला प्रशंसेचे चांगले रिझल्ट मिळाले. पण काही वेळातच टीकेचे साइड इफेक्ट दिसू लागले. टीकाकारांनी प्रशंसेसाठी मोदी समर्थकांनी निवडलेल्या मुद्द्यांमधूनच टीकेसाठी मुद्दे निवडले.
https://twitter.com/kmlshdbh/status/1366292773087797255?s=20
लसीचा डोस, टीकेचे साइड इफेक्ट
साइड इफेक्ट -१ : मोदींचा गमछा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिधान केलेला गमछा हा आसामी पद्धतीचा होता. त्यांनी आसाममधील निवडणूक लक्षात घेऊन तो जाणीवपूर्वक वापरल्याची टीका झाली.
https://twitter.com/ShrutiDhore/status/1366292000245342208?s=20
साइड इफेक्ट – २ : लसीकरणातील कर्मचारी
पंतप्रधान मोदींना लस देणाऱ्या दोन्ही नर्सची निवड निवडणुका लक्षात घेऊनच करण्यात आल्याची टीकाही झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लस देणारी परिचारिका पी. निवेदा या पुदुच्चेरीच्या रहिवासी आहेत. त्यांना सहाय्य करणाऱ्या परिचारिका रोसम्मा अनिल या केरळच्या आहेत. ही दोन्ही राज्ये लवकरच निवडणुकीला सामोरे जात असतात.
आज सकाळी सात वाजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंच्या कार्यकाळात बांधलेल्या दिल्लीतील AIIMS मध्ये जाऊन कोरोना लस घेतली…#सहजच
— राज वर्मा RJ (@RajVarm02038665) March 1, 2021
साइड इफेक्ट – ३ : लसीकरणाचा संदेश, पण मास्क कुठे?
वैक्सीन लेने जाऊंगा मैं, मास्क नही लगाऊँगा मैं…#फोटोजीवी#कैमेराजीवी @INCMumbai @INCMaharashtra@INCIndia pic.twitter.com/kbfyc9SZ6T
— Prashant🇮🇳 (@prashantdhumal) March 1, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचे छायाचित्र ट्विट केले. त्यांचा उद्देश लस घेण्याबद्दलचे सामान्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा असल्याची प्रशंसाही झाली. पण आरोग्याबद्दल एवढे सचेत असणाऱ्या पंतप्रधानांनी ट्विट करण्यासाठी छायाचित्र घेताना मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक मानला जाणारा मास्क किंवा चेहऱ्यावरचा नेहमीचा कपडाही बांधलेला नाही. खरंतर त्यांच्याकडे मास्क आहे. छायाचित्रात दिसत आहे. पण तो त्यांनी बहुधा छायाचित्रासाठी काढला आहे. चेहरा उघडा आहे. त्यामुळे ते ‘कॅमेराजीवी’ असल्याची टीका झाली.